पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Kisan e-KYC | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Scheme) शेतकऱ्यांना द्यावयाचा लाभ सहजपणे वितरित करता यावा, यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची ओळख पडताळणी (Identity Verification) म्हणजेच ई – केवायसी (PM Kisan e-KYC) पूर्ण केली जात आहे.
यासाठी 31 मे 2022 ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
मात्र, आता या कालावधीत हे काम पूर्ण करु न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan) ई – केवायसी करण्याची मुदत 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबियास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) दरवर्षी प्रतिहप्ता दोन हजार रुपयेप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
आज अखेर या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील (Maharashtra) 1 कोटी 9 लाख 46 हजार लाभार्थ्यांना एकूण 18 हजार 151 कोटी 70 लाख रुपयांचा लाभ आदा करण्यात आला आहे. (PM Kisan e-KYC)
लाभार्थ्यास स्वत: पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई – केवायसी पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या दोन्हीपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई – केवायसी पडताळणी करता येईल.
यापूर्वी ई – केवायसी 31 मे 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
पीएम किसान पोर्टलवरील (PM Kisan Portal) लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी (Aadhaar Number)
संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या (OTP) आधारे स्वत:ची ई – केवायसी पडताळणी करता येईल.
यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम 15 रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येणार आहे.
—
महाराष्ट्रात 53 लाख शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण
महाराष्ट्रात 26 मे 2022 अखेर एकूण 52 लाख 82 हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.
उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांची ई – केवायसी पडताळणी केंद्र शासनाने (Central Government) दिलेल्या 31 जुलै 2022 च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी,
असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title :- PM Kisan e-KYC | Verification of 53 lakh farmers completed in Maharashtra Extension of deadline for e-KYC for PM Kisan scheme complete the process by 31 jully 2022
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update