PM Kisan | शेतकरी ‘या’ पध्दतीनं पुढील हप्त्यासोबत मिळवू शकतात मागील अडकलेला हप्ता, जाणून घ्या काय करावे लागेल?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | जर तुम्ही पीएम किसान योजनेच (PM Kisan Scheme) लाभार्थी आहात आणि तुम्हाला मागील हप्ता मिळाल नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सहजपणे आपला थांबलेल्या हप्त्याची रक्कम मिळवू शकता. पीएम किसान योजनेंतर्गत एखाद्या शेतकर्‍याचे नाव यादीत आले असेल आणि काही कारणामुळे त्याला हप्ता अडकला असेल तर पुढील हप्त्यासह मागील अडकलेल्या हप्त्याचे पैसे सुद्धा मिळतील.

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते. शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये दिले जातील, म्हणजे त्यांना दर चार महिन्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.

अनेक शेतकर्‍यांना 9 वा हप्ता मिळाला नाही

अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना 9व्या हप्त्याचे पैसे मिळू शकले नाही, म्हणजे त्यांचा हप्ता अडकला. या योजनेच्या नियमानुसार एखाद्या शेतकर्‍याचे लाभार्थींच्या यादीत नाव आले आहे आणि काही कारणामुळे हप्ता अडकला आहे तर पुढील हप्त्यासह मागील हप्त्याचे पैसे मिळू शकतात. मात्र यासाठी अट ही आहे की, शेतकर्‍याने आपल्या अर्जात शेतकर्‍यांनी आपल्या अर्जातील त्रूटींची दुरूस्ती केलेली असावी.

हप्ता न मिळण्याचे सर्वात मोठे कारण आधार, अकाऊंट नंबर आणि बँक अकाऊंट नंबर चुकीचा असणे हे आहे. अशावेळी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे यास ठिक करू शकता. यासाठी तुम्हाला लिंक https://pmkisan.gov.in/Grievance.aspx वर व्हिजिट करावी लागेल.

पुढील हप्त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत करा रजिस्टेशन

जे शेतकरी PM kisan Samman Nidhi चा लाभ घेत नाहीत, ते आता रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. जर शेतकर्‍याचा अर्ज आता स्वीकारला गेला तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये 2000 रुपये खात्यात येतील. यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा 2000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला 4000 रुपये मिळवायचे असतील तर तुमच्याकडे 30 सप्टेंबरपर्यंतची चांगली संधी आहे.

 

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.

यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.

नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.

नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

 

Web  Title : Pm-Kisan | farmers can get the previous pending pm kisan installment with the next installment check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! SIM card बाबत ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या

Pune Crime | जामीनावर सुटलेल्या गुंड सुरज रसाळवर टोळक्याकडून कोयत्याने वार; उंड्रीमध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Nitin Gadkari | नितिन गडकरींनी अनेक वर्षे पत्नीपासून लपवले हे मोठे गुपित, रस्त्यासाठी पाडले होते सासर्‍याचे घर