PM Kisan | आयटीआर फाईल करणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतात का ‘पीएम-किसान’चे 6 हजार? जाणून घ्या

नवी दिल्ली : PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojna) अंतर्गत पात्र शेतकर्‍यांना दोन हजार रूपयांच्या 3 हप्त्यांत वर्षाला 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. मात्र, अजूनही अनेकांना यासाठी कोण-कोण पात्र आहेत, याबाबत माहिती नाही. जे शेतकरी प्राप्तीकर रिटर्न (ITR) फाईल करतात, ते या योजनेसाठी पात्र आहेत का, असा प्रश्न नेहमी विचारला (PM Kisan) जातो.

या योजनेसाठी कोण पात्र नाहीत ते जाणून घेवूयात…

– विद्यमान किंवा माजी संविधानिक पदावरील व्यक्ती.

– माजी आणि विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, कोणत्याही राज्यात आमदार किंवा विधान परिषद आमदार,
महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद चेयरमन.

– मल्टी टास्किंग स्टाफ, चतुर्थ वर्ग आणि वर्ग डी चे कर्मचारी वगळता सर्व सरकारी कर्मचारी.

– 10 हजारपेक्षा जास्त पेन्शन घेणार.

– मागील वर्षात प्राप्तीकर भरलेले.

– डॉक्टर, इंजिनियर, वकील, सीए, आर्किटेक्ट इत्यादी (व्यवसायिक संस्थांसोबत नोंदणीकृत)

याशिवाय, ज्या शेतकर्‍यांकडे संस्थागत जमीन आहे ते सुद्धा पात्र नाहीत. ही श्रेणी सोडून सर्व शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत, मग ते आयटीआर भरणारे आहेत किंवा नाहीत.

मिळत नसेल हप्ता तर या चुका सुधारा

हप्ता न मिळण्याचे सर्वात मोठे कारण आधार, अकाऊंट नंबर आणि बँक अकाऊंट नंबर चुकीचा असणे हे आहे. अशावेळी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे यास ठिक करू शकता. यासाठी तुम्हाला लिंक https://pmkisan.gov.in/Grievance.aspx वर व्हिजिट करावी लागेल.

हे देखील वाचा

UPSC Exam | ‘सारथी’ संस्थेच्या 21 विद्यार्थ्यांचे UPSC परीक्षेत घवघवीत यश

Ajit Pawar | ‘…कशी तुझी जिरवली आता भर 100 चं’, अजित पवारांची फटकेबाजी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Kisan | farmers filing itr are eligible or not to get benefits of pm kisan scheme know here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update