Advt.

PM Kisan योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना मिळते कमी व्याजावर कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. म्हणजेच दर चार महिन्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये पाठवले जातात. या योजनेत आतापर्यंत 10 तारखेपर्यंत हप्ता देण्यात आला आहे. (PM Kisan)

 

यासोबतच शेतकर्‍यांना इतर फायदेही दिले जातात. या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी विमा संरक्षण देखील घेऊ शकतात. यासोबतच या शेतकर्‍यांना कमी व्याजदरात कर्जही सहज मिळते. या योजनेअंतर्गत कर्ज कसे घ्यायचे ते जाणून घेऊयात…

 

शेतकर्‍यांना हे कर्ज किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card – KCC) दिले जाते. अलीकडेच, प्रधानमंत्री किसान योजना सरकारने किसान क्रेडिट कार्डशी जोडली आहे, जेणेकरून शेतकर्‍यांना कर्ज घेणे सोपे होईल. या योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे ते जाणून घेवूयात. (PM Kisan)

 

कसे बनवावे किसान क्रेडिट कार्ड
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला प्रथम पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला उजव्या बाजूला KCC फॉर्म डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.

 

येथे तुम्ही हा फॉर्म डाऊनलोड करा आणि तो पूर्णपणे भरा. फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर, तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डची फोटो कॉपी जोडावी लागेल. किसान क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व कागदपत्रे घेतल्यानंतर, तुम्ही KCC फॉर्म बँकेत सबमिट करू शकता. येथे तुमचे कार्ड बँक बनवते.

कोणत्या बँका देतात परवानगी
तुम्हाला केसीसी साठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही मोठ्या बँकेशी संपर्क साधू शकता.
यामध्ये तुम्ही सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया (Bank of India)
आणि आयडीबीआय बँक (IDBI Bank) यांसारख्या बँकांमधून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

 

किती व्याजदराने कर्ज मिळेल
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकर्‍यांना कमी व्याजावर कर्ज दिले जाते.
किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार,
जर कर्ज घेतलेल्या शेतकर्‍याने कर्जाची वेळेवर परतफेड केली तर त्याला तीन टक्के व्याज सवलत दिली जाते,
म्हणजेच 7 टक्के व्याजदरावर, तुम्हाला 4 टक्केच व्याज भरावे लागेल.
किसान क्रेडिट सक्रिय झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत 1 लाखाचा अपघाती विमा देखील दिला जातो.

 

 

Web Title :- PM Kisan | farmers who take advantage of pm kisan scheme get loan on low interest know how can get benefit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Systematic Investment Plan – SIP | बंपर रिटर्नसाठी 2022 मध्ये ‘या’ 4 SIP मध्ये करा इन्व्हेस्ट, तीन वर्षात गुंतवणुकदार झाले मालामाल

PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क