PM Kisan | शेतकर्यांसाठी मोठी खुशखबर ! नवीन वर्षापुर्वीच मोदी सरकार देईल गिफ्ट, बँक अकाऊटमध्ये येतील 4000 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना सरकार नवीन वर्षापूर्वी भेट देण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात 15 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत 10 वा हप्ता (10th instalment Date) ट्रान्सफर होऊ शकतो. मोदी सरकारने (Modi Government) मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकर्यांना पैसे ट्रान्सफर केले होते. मीडिया रिपोर्टनुसार यावेळी सुद्धा सरकारने 10 वा हप्ता ट्रान्सफर करण्याची पूर्ण तयारी केली आहे. (PM Kisan)
यावेळी येऊ शकतात 4000 रुपये
ज्या शेतकर्यांना अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही त्या लोकांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकाचवेळी येतील, म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. रिपोर्टनुसार, केंद्र सरकार (Central Government) प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची (PM Kisan) रक्कम दुप्पट करण्यावर विचार करत आहे. परंतु ही सुविधा त्याच शेतकर्यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल.
तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही तपासून पहा
जर तुम्ही PM Kisan योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.
असे चेक करा यादीत नाव
1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर Get Report वर क्लिक करा.
6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.
अशा प्रकारे तपासा हप्त्याचे स्टेटस
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल.
Web Title :- PM Kisan | good news farmers could get 10th instalment 4k before new year check details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | दिघीतील लॉजवरील धक्कादायक घटना ! 35 वर्षीय महिलेची हत्या करुन युवकाची आत्महत्या