PM-Kisan | खुशखबर! आता शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील 12000 रुपये, जाणून घ्या कसे घेऊ शकता तुम्ही?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – PM-Kisan | पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM kisan Samman Nidhi Scheme) सरकार शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपये देते. परंतु मीडिया रिपोर्टनुसार मोदी सरकार शेतकर्‍यांना (Modi Government) मिळणारी ही सुविधा डबल करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये तीन हप्त्यात मिळतील.

असा घ्या लाभ

या योजनेत रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. घरबसल्या ऑनलाइन ही प्रोसेस पूर्ण करता येते. तसेच ग्रामसेवक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता.

अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन

-पीएम-किसानच्या पोर्टल (pmkisan.gov.in) वर क्लिक करा.

-याच्या फार्मर कार्नरच्या NEW FARMER REGISTRATION च्या पयार्यावर क्लिक करा.

-यानंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाका.

-यानंतर क्लिक हियर टू कंटिन्यूवर क्लिक करा.

-यामध्ये फॉर्म दिसेल, तो पूर्ण भरा.

-तो भरून सेव्ह करा. आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली, ज्यामध्ये पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करण्यावर सुद्धा चर्चा केली आहे. मात्र यावर केंद्राकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

जाणून घ्या कधी येतो हप्ता

दर 4 महिन्यात 2000 रुपयांचा हप्ता येतो. पीएम किसान पोर्टलनुसार, स्कीमचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चच्या दरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान येतो. तर तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवला जातो.

Web Title :  PM Kisan | good news farmers will get 12000 rupees under the pm kisan scheme check know

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page
and Twitter for every update

COVID-19 in India | कोरोनाचा ग्राफ भीतीदायक ! देशात गेल्या 24 तासात आल्या 46759 नवीन केस, 509 जणांचा मृत्यू

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल;
जाणून घ्या प्रकरण

NEET-UG 2021 Exam News | नीट यूजी 2021 परीक्षा होणार नाही स्थगित,
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती