PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्यांना 10 व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळू शकतात 4000 रुपये, तात्काळ जमा करा हे कागदपत्र, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM-Kisan | पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकर्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु मीडिया रिपोर्टनुसार मोदी सरकार (Modi Government) शेतकर्यांना मिळणारी ही सुविधा डबल करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर शेतकर्यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये तीन हप्त्यात मिळू शकतात.
सरकारने या योजनेच्या (PM-Kisan) जुन्या व्यवस्थेत काही बदल केले आहेत. आता पीएम किसान सम्मान योजनेचा लाभ त्याच शेतकर्यांना मिळेल ज्यांच्या नावावर शेती असेल. म्हणजे पहिल्या प्रमाणे वारसागत जमीनीत भागीदारी असलेल्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्या नावावर शेती असेल तर ताबडतोब हे काम करा, अन्यथा पुढील हप्ता अडकू शकतो.
द्यावी लागेल ही माहिती
सरकारने योजनेत काही सुधारणा केल्या आहेत. किसान सम्मान निधी योजनेत नवीन रजिस्ट्रेशन करणार्या शेतकर्यांना आता अर्जामध्ये जमीनीचा प्लॉट नंबरसुद्धा सांगावा लागेल. मात्र नवीन नियमाचा प्रभाव योजनेशी संबंधीत जुन्या लाभार्थ्यांवर पडणार नाही.
जाणून घ्या कोणत्या शेतकर्यांना मिळतो लाभ
पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत केवळ त्याच शेतकर्यांना याचा लाभ मिळतो, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर कृषीयोग्य शेती असेल. तसेच, इन्कम टॅक्स भरणार्या शेतकर्याला योजनेच्या बाहेर ठेवले जाईल. यामध्ये वकील, डॉक्टर, सीए इत्यादी सुद्धा सहभागी होऊ शकत नाहीत.
या महिन्यांमध्ये येतो हप्ता
शेतकर्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये 3 हप्त्यात पाठवले जातात. दर 4 महिन्यात 2000 रुपयांचा हप्ता येतो.
PM Kisan पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चच्या दरम्यान येतो.
दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान शेतकर्यांच्या खात्यात येतो.
तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्यादरम्यान शेतकर्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो.
या चुकांमुळे अडकतात पैसे
– बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.
– IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.
– शेतकर्याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.
– गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल.
Web Titel :- PM Kisan | good news pm kisan will get 4000 rupees but not be available without this document
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune News | महाराष्ट्राने नेहमीच राजकीय आणि सांस्कृतिक आदर्श प्रस्थापित केला – नितीन गडकरी