PM Kisan | शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपयांऐवजी येतील 4000 रुपये! सरकार वाढवणार आहे योजनेची रक्कम?

नवी दिल्ली : PM Kisan देशातील शेतकर्‍यांना आगामी काही दिवसात चांगली बातमी मिळू शकते. सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते ( government can double the amount of PM Kisan Yojana). मीडिया रिपोर्टनुसार शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये दिले जातील, म्हणजे त्यांना दर चार महिन्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.

PM Kisan मध्ये आता 4000 रुपये मिळतील?(Will PM Kisan get Rs 4000 now?)

मीडिया रिपोर्टनुसार बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती.

बिहारच्या कृषी मंत्र्यांनुसार, सरकार पीएम किसान सम्मान निधीची रक्कम दुप्पट केली जाणार आहे, यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. मात्र, हा केवळ मंत्र्यांचा दावा आहे, सरकारकडून असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही.

19500 कोटी रुपये ट्रान्सफर

पीएम मोदी यांनी मागील सोमवारी देशातील 9.75 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यात 19,500 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. याच्या एक दिवस अगोदर पंतप्रधानांनी म्हटले होते की, सरकार देशातील शेतकर्‍यांचे जीवन सुरळीत करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

ते पुढे म्हणाले होते की, असाच एक प्रयत्न प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम-किसान) योजना
आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून सुद्धा
अंदाज बांधला जात आहे की पीएम किसानची रक्कम वाढवली जाऊ शकते.

हे देखील वाचा

Parambir Singh Extortion Case | परमबीर सिंह वसूली केसमध्ये गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरूद्ध सुद्धा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

RBI Rules | चेक देण्यापूर्वी करू नका ही चूक, अन्यथा भरावा लागेल दंड! जाणून घ्या RBI चे नवीन नियम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pm kisan govt may raise installment to rs 4000 from 2000 here is the detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update