PM Kisan | सर्व शेतकर्‍यांना दरमहिना मिळतील 3000 रुपये, जाणून घ्या काय आहे ही नवीन योजना आणि कसा करावा अर्ज?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kisan | जर तुम्ही शेतकरी आहात तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. यामध्ये एक विशेष योजना आहे – ‘पीएम किसान मानधन योजना’ (PM Kisan Mandhan Pension Scheme). ही पेन्शन योजना आहे. या पेन्शन स्कीम (Pension Scheme) अंतर्गत शेतकर्‍यांना दरमहिना 3000 रुपये दिले (PM Kisan) जातात.

 

पीएम शेतकरी मानधन योजनेच्या (PM Kisan) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर पेन्शनची तरतूद आहे. यामध्ये 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत कुणीही शेतकरी गुंतवणुक करू शकतो. या अंतर्गत शेतकर्‍यांना 3000 रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळते. याबाबत जाणून घेवूयात.

 

पीएम किसान मानधन योजना काय आहे?

 

या योजनेची सुरूवात केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. पीएम किसान मानधन योजनेला शेतकरी पेन्शन योजनेच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. प्रधानमंत्री किसान मानधन योजना अंतर्गत सर्व छोट्या आणि अल्प भूधारक शेतकर्‍यांना वृद्धत्वात योग्यप्रकारे जीवन जगण्यासाठी सरकारद्वारे पेन्शन दिली जाते. या अंतर्गत देशातील छोट्या आणि अल्प भूधारक शेतकर्‍यांना 60 वर्षाचे वय पूर्ण होताच दरमहिना 3000 रुपयांची पेन्शन रक्कमेची आर्थिक मदत दिली जाते.

 

दरमहिना 55 रु. भरावे लागतील

 

18 वर्ष वयाच्या लाभार्थ्यांना दर महिना 55 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. तर 40 वर्षाच्या वयाच्या लाभार्थ्यांना 200 रुपयांचा प्रीमियम भरावा लागले.

 

या शेतकर्‍यांना दिली जाते मदत

 

पीएम किसान (PM Kisan) स्कीमचा लाभ घेणारे शेतकरी मानधन योजना अतंर्गत आपल्यासाठी पेन्शनची व्यवस्था सुद्धा करू शकतात. पीएम किसान प्रमाणेच मानधन योजनासुद्धा छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी आहे. मानधन स्कीम अंतर्गत शेतकर्‍यांसाठी सरकार पेन्शनची व्यवस्था करते. जर लाभार्थ्याचा काही कारणामुळे मृत्यू झाला तर योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन लाभार्थ्याच्या पत्नीला मिळेल. मात्र पेन्शनची रक्कम अर्धी म्हणजे 1,500 रुपये असेल.

 

जाणून घ्या कसा करावा अर्ज?

 

 • सर्वप्रथम वेबसाइटवर जा https://maandhan.in/
 • आता Click Here to Apply Online वर click क्लिक करा.
 • येथे Self Enrolment वर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
 • पीएम किसान मानधन योजना अंतर्गत शेतकर्‍यांना 60 वर्ष वयानंतर पेन्शन मिळेल.
 • पीएम किसान (PM Kisan) चे लाभार्थी, असाल तर कोणत्याही कागदपत्रांच्या कार्यवाहीची आवश्यक नाही.
 • तुमचे थेट रजिस्ट्रेशन पीएम किसान मानधन स्कीममध्ये सुद्धा होईल.

 

द्यावे लागतील हे कागदपत्र

 

 1. आधार कार्ड
 2. ओळख पत्र
 3. वयाचा दाखला
 4. उत्पन्नाचा दाखला
 5. शेतीचा सातबारा
 6. बँक खात्याचे पासबुक
 7. मोबाइल नंबर
 8. पासपोर्ट साईज फोटो

 

Web Title : PM Kisan | kisan get 3000 rupees per month pension under pm kisan maandhan pension scheme check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांचे पुन्हा शतक, गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nashik Crime | श्रद्धांजलीसाठी चांगले फोटो ठेवा! Whatsapp Status ठेवून नाशिकमधील तरुणाची आत्महत्या

e-filing portal | आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रिटर्न दाखल करण्याच्या पोर्टलवर वार्षिक माहिती विवरण मिळवू शकतात करदाते