PM Kisan Mandhan Scheme | खुशखबर ! शेतकर्‍यांना आता 2000 रुपयांशिवाय दरमहा मिळतील 3000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kisan Mandhan Scheme | जर तुम्ही सुद्धा शेतकरी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. पीएम किसान (PM Kisan) खातेधारकांना वर्षभरात 6000 रुपयांच्या अतिरिक्त आता दरमहिना 3 हजार रुपये सुद्धा मिळतील. यासाठी त्यांना पीएम किसान मानधन (PM Kisan Mandhan Scheme) मध्ये थेट रजिस्ट्रेशन करावे लागेल. यामध्ये कोणत्याही कागदपत्रांच्या कारवाईची आवश्यकता नाही. पेन्शन योजनेसाठी आवश्यक अंशदान सुद्धा किसान सम्मान निधी अंतर्गत येणार्‍या सरकारी मदतीतून कापले जाईल.

पीएम किसान मानधन योजनेबाबत जाणून घ्या

पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Scheme ) अंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर पेन्शनची तरतूद आहे.
या योजनेत 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत वयाचा कुणीही शेतकरी सहभागी होऊ शकतो.

यात वयाच्या हिेशेबाने मासिक अंशदान केल्यास 60 च्या वयानंतर 3000 रुपये मासिक किंवा 36000 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल.
यासाठी अंशदान 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक आहे. अंशदान सबस्क्रायबर्सच्या वयावर अवलंबून आहे.

 

कसा आणि किती वाढेल लाभ

पीएम किसान अंतर्गत सरकार गरीब शेतकर्‍यांना दरवर्षी 2000 रुपयांचे 3 हप्त्यात 6000 रुपयांची आर्थिक मदत देते.
यातील खातेधारक जर पेन्शन स्कीम पीएम किसान मानधनमध्ये सहभागी झाला तर रजिस्ट्रेशन सहज होते.
आणि जर पर्याय घेतला तर पेन्शन योजनेत दरमहिना कापले जाणारे अंशदान सुद्धा याच 3 हप्त्यांच्या मिळणार्‍या रक्कमेतून कापले जाईल.

पेन्शन योजनेत किमान 55 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये दरमहिना योगदान द्यावे लागते. याप्रमाणे कमाल योगदान 2400 रुपये आणि मिनिमम योगदान 660 रुपये झाले.
6 हजार रुपयांमधून कमाल योगदान 2400 रुपये कापले गेले तरीसुद्धा सम्मान निधीचे 3600 रुपये खात्यात शिल्लक राहतील.
(PM Kisan Mandhan Scheme ) तर, वयाच्या 60 व्या वर्षानंतर 3 हजार रुपये महिना पेन्शनचा लाभ मिळू लागेल.
तर, 2000 चे 3 हप्तेसुद्धा येत राहतील. 60 व्या वयानंतर एकुण फायदा 42000 रुपये वार्षिक होईल.

 

Web Title : PM Kisan Mandhan Scheme | pm kisan beneficiaries can get 2000 rupees installment with 3k per month pension check how marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 54 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या महासचिवपदी जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांची निवड

E-Shram Portal | आतापर्यंत 4 कोटी मजूरांनी केले रजिस्ट्रेशन; महिला कामगार आघाडीवर