PM Kisan ManDhan Yojana | 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना होणार फायदा, दरमहिना बँकेत येईल 3,000 रुपये पेन्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan ManDhan Yojana | शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारने अनेक योजना चालवल्या आहेत. शेतकर्‍यांना आर्थिक सुरक्षा देण्यासह त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा सरकारचा उद्देश आहे. या अंतर्गत पीएम किसान मानधन योजनेंतर्गत (PM Kisan ManDhan Yojana) शेतकर्‍यांना 36,000 रूपये वार्षिक पेन्शन देत आहे. याचा फायदा 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे शेतकरी घेऊ शकतात. मात्र, यासाठी अगोदर गुंतवणूक करावी लागते. या योजनेचे नियम जाणून घेवूयात…

 

पीएम किसान मानधन योजनेत गुंतवणूक
पीएम किसान मानधन योजनेत 18 वर्षापासून 40 वर्षांपर्यंतचे शेतकरी गुंतवणूक करू शकतात. या योजनेंतर्गत शेतकर्‍याला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर 3000 रूपये महिना पेन्शन दिली जाते. मात्र, पेन्शनसाठी शेतकर्‍यांना अगोदर गुंतवणूक करावी लागते. दर महिना 55 रूपये ते 200 रूपयांच्या दरम्यान गुंतवणूक करावी लागते.

 

हे शेतकरी घेऊ शकतात लाभ
2 हेक्टरपर्यंत कृषीयोग्य जमीन असलेले सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घेणारे शेतकरी सुद्धा लाभ घेऊ शकतात.

 

वार्षिक मिळतात 36000 रुपये
पीएम किसान मानधन योजनेत वार्षिक 36,000 रूपये मिळतात. म्हणजे शेतकर्‍यांना दरमहिना 3,000 रूपये पेन्शन म्हणून मिळतात.

 

Web Title :- PM Kisan ManDhan Yojana | pm kisan mandhan yojna gives rupees 36000 pension to kisan above 60 years of age check details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा