PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येतील 2,000 रुपये, ‘या’ यादीत तपासा तुमचे नाव आहे किंवा नाही?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्त्याचे पैसे येणार आहेत. जे शेतकरी दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्या खात्यात 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये येतील. याचा अर्थ हा आहे की, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत रजिस्टर्ड शेतकर्‍यांच्या खात्यात सरकार दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये पाठवेल.

 

तर मोदी सरकारने (Modi Government) मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत पैसे ट्रान्सफर केले होते.
आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर केले आहेत.

 

तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही तपासून पहा

 

जर तुम्ही PM Kisan योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की,
या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.

 

यादीत असे तपासा तुमचे नाव

 

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा.

6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

अशा प्रकारे तपासा हप्त्याचे स्टेटस

 

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा.
येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा.
आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा.
जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल.

 

PM Kisan योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकर्‍यांना 6 हजार रुपये वार्षिक मिळतात.
सरकार ही रक्कम खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करते.
जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा फायदा घेऊ शकत नसाल तर, अस्वस्त होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सुद्धा या योजनेत आपले नाव नोंदवू शकता.

 

Web Title : PM Kisan | pm kisan 10th installment 2000 rupees will released on 15 december check beneficiary list

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

JanDhan Account | तुमचे सुद्धा असेल SBI मध्ये जनधन खाते तर सेव्हिंग खात्यात ‘या’ पध्दतीनं करू शकता ट्रान्सफर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Maharashtra State Women Commission | कौमार्य चाचणीच्या घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली दखल, अहवाल सादर करण्याचे आदेश

PF Account e-Nomination | पीएम खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन करणे झाले अनिवार्य ! आता विमा आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी येणार नाही अडचण