PM Kisan | ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | पीएम किसान सम्मान निधीचा पुढील म्हणजे 10 वा हप्ता (PM Kisan Samman Nidhi 10th Installment) 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान कधीही खात्यात येऊ शकतो. शेतकर्‍यांना पैसे पाठवण्यासाठी अनेक राज्यांनी Rft Sign केली आहे आणि लवकरच FTO सुद्धा जेनरेट होईल. तुम्ही सुद्धा लिस्टमध्ये आपले नाव तपासून घ्या कारण यावेळी सरकार बोगस नोंदणी करणार्‍या अपात्र शेतकर्‍यांसाठी कठार पावले उचलत आहे. कोणत्या शेतकर्‍यांना लाभ मिळणार नाही ते जाणून घेवूयात. (PM Kisan)

 

PM Kisan योजनेंतर्गत 1 वर्षात 3 हप्त्यात शेतकर्‍यांना सरकार 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. दर 4 महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात 9 हप्ते पाठवण्यात आले आहेत. आता दहावा हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात बँक खात्यात पाठवले जातील.

असे चेक करा यादीत नाव

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा.

6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

जाणून घ्या कोणत्या शेतकर्‍यांना मिळत नाही योजनांचा लाभ

इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा या लाभापासून वंचित असतील.

ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही त्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे.

जर तुमच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतजमीन असेल तर तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.

केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजारेपक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही.

व्यवसायिक, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जे शेती करत असले तरी त्यांना लाभ मिळणार नाही. (PM Kisan)

जर एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

 

Web Title :- PM Kisan | pm kisan 10th installment will not come if they do not submit this document

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption Bureau Maharashtra | 10 लाखाचे लाच प्रकरण ! पोलिस अधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलिस दलात खळबळ

Sanjay Raut | शिवसेना UPA मध्ये सहभागी होणार? राहुल गांधींच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…