PM-Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 10वा हप्ता मिळवण्याची शेवटची संधी, आता 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पीएम किसान (PM-Kisan) अंतर्गत जर शेतकर्‍यांना जर पुढील हप्ता (PM Kisan 10th installment) मिळण्यात अडचण असेल तर तो मिळवण्याची आणखी एक संधी आहे. मात्र मोदी सरकारने ही संधी केवळ उत्तर प्रदेशच्या शेतकर्‍यांनाच दिली आहे. होय, उत्तर प्रदेश कृषी विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 11 ते 13 ऑक्टोबरपर्यंत पीएम किसान समाधान दिवसाचे आयोजन केले आहे.

येथे आधार नंबर, नाव, खाते, आयएफएसीकोड सारख्या समस्यांचे निवारण होईल जेणेकरून शेतकर्‍यांना 10 वा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
आता पीएम किसान (PM-Kisan) पोर्टलवर नवीन नोंदणी बंद आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi) यांनी पीएम किसानसंबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर
‘पीएम किसान समाधान दिवस’ (pm kisan samadhan divas) सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
या दरम्यान सामाधान दिनी प्रामुख्याने इनव्हॅलिड आधार आणि आधारनुसार नाव योग्य केले जाईल.

या कॅम्पचा हेतू शेतकर्‍यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचवण्याचा आहे.
यासाठी कृषी विभाग आणि इतर विभागांमध्ये कार्यरत कम्प्यूटर ऑपरेटरला तीन दिवसासाठी राजकीय बियाणे गोदामात तैनात केले आहे.

कुठे लागणार कॅम्प?

जर युपीच्या शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा लाभ मिळत नसेल तर ते 11 ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान कार्यालयाच्या वेळेत आपल्या तालुक्याच्या बियाणे गोडाऊनवर आधार कार्ड आणि बँक खात्याच्या माहितीसह पोहचून डाटा दुरूस्त करू शकतात.
याशिवाय इतर समस्या असल्यातरी त्यांचे निवारण करण्यास मदत मिळणार आहे.
पीएम किसानचा पुढील हप्ता 15 डिसेंबर 2021 पर्यंत येऊ शकतो.

 

Web Title : PM Kisan | pm kisan beneficiaries do respiration for 10th installment before 13 october check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rupali Chakankar | आयकर विभागाच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट चुकता केला जाईल, रुपाली चाकणकर यांचा ‘घणाघात’

IMPS | आरबीआयनं बदलला पैशांच्या व्यवहाराचा ‘हा’ नियम, आता 2 लाखाऐवजी 5 लाख रुपये करू शकता ‘ट्रान्सफर’; जाणून घ्या

Pune Crime | खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ लक्झरी बसमधून 6 किलो चरस जप्त, राजगड पोलिसांकडून तरुणाला एकाला अटक