PM Kisan | कोट्यावधी शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही ‘पीएम किसान’चे पैसे, मोदी सरकारने बदलले नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | जर तुम्ही पीएम किसान (PM Kisan) चे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अतिशय कामाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) नियम मोदी सरकारने (Modi Government) बदलला आहे.

 

सरकारने पीएम किसान योजनेत होत असलेल्या फसवेगिरीला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य केले आहे. आता शेतकर्‍यांना इतर कागदपत्रांसह रेशन कार्ड (Ration card) सुद्धा द्यावे लागेल. याशिवाय हप्ता मिळणार नाही.

 

रेशन कार्डचा नंबर आल्यानंतरच पती किंवा पत्नीला किंवा त्या कुटुंबातील सदस्याला पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. योजनेंतर्गत नवीन नोंदणी केल्यानंतर रेशन कार्ड नंबर देणे अनिवार्य असेल. याशिवाय कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी बनवून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

 

आता द्यावी लागतील ही कागदपत्रे

आता सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक आणि प्रतिज्ञापत्रांची हार्डटकॉपी जमा करण्याची अनिवार्यता बंद केली आहे. आता या कागदपत्रांची पीडीएफ फाईल बनवून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकर्‍यांच्या वेळेची बचत होईल सोबतच नवीन व्यवस्थेत योजना पारदर्शी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

या तारखेला येईल हप्ता

सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख ठरवली आहे.
केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत 10वा हप्ता जारी करण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकर्‍यांना पैसे ट्रान्सफर केले होते.

 

6000 रुपये वार्षिक देते सरकार

शेतकर्‍यांना केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM kisan Samman Nidhi Scheme) शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपये देते.
PM Kisan योजनेत रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. घरबसल्या ऑनलाइन ही प्रोसेस पूर्ण करता येते.
तसेच ग्रामसेवक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता.

 

Web Title :- pm kisan beneficiaries without ration cad could not get 10th installment money check why

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा