PM Kisan | शेतकर्यांसाठी मोठी बातमी ! जाणून घ्या 12 कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात कधी येतील 2000 रुपये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 1 जानेवारी रोजी पीएम किसान (PM Kisan) योजनेअंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 10 वा हप्ता ट्रान्सफर केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM Kisan) योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. दहावा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आला, त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्यांच्या खात्यावर 11 वा हप्ता येण्याचा अंदाज आहे. यासाठी प्रथम तुमच्या खात्याचे स्टेटस तपासा.
असे तपासा स्टेटस
– सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
– येथे उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय मिळेल.
– येथे ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.
– नवीन पेजवर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता ?
– तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक टाका. त्यानंतर Get Data वर क्लिक करा.
– येथे क्लिक केल्यानंतर, व्यवहाराची सर्व माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात कोणता हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला. (PM Kisan)
– येथे 9 व्या आणि 8 व्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.
– जर तुम्हाला FTO is generated and Payment confirmation is pending असे दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया केली जात आहे.
Web Title :- PM Kisan | pm kisan samman nidhi april month kisan will receive 11th installment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update