PM Kisan अंतर्गत खात्यात आली नसेल रक्कम तर काय करावे, कसे ट्रान्सफर होतील 2000 रुपये? जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्त संस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (pm kisan samman nidhi yojana) 10 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी केंद्राने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली. पण, असे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या खात्यात विविध कारणांमुळे ही रक्कम जमा होऊ शकली नाही. (PM Kisan)

ज्या शेतकर्‍यांना त्यांचे स्टेटस तपासल्यावर कमिंग सून असा मेसेज दिसतो, अशावेळी चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात पैसे लवकरच येणार असल्याचे या मेसेजवरून स्पष्ट होते. तरीही यादीत नाव आले नाही, तर तक्रार करू शकता.

ही तक्रार पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 आणि [email protected] या ई-मेल आयडीवर करता येईल. इतकंच नाही तर याशिवाय इतरही काही नंबर आहेत, जिथे तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता. ते खालीलप्रमाणे आहेत.

    • PM  किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
    • पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक : 155261
    • पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092, 23382401
    • PM किसानची नवीन हेल्पलाईन : 011-24300606

 

  • पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109

स्टेटस चेक करण्याची ही आहे प्रक्रिया :

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल. (PM Kisan)

पीएम किसान योजनेत शेतकर्‍यांना 6000 रुपये दरवर्षी दिले जातात. ही रक्कम दर चार महिन्यात 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यात मिळते.

Web Title : PM Kisan | pm-kisan samman nidhi did not get 10th installment yet so do this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे