PM Kisan | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा 11 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान किसान सम्मान निधी योजने अंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. दरम्यान केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. याबाबत माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Minister Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे. (PM Kisan)

 

पंतप्रधान किसान सम्मान निधी योजने अंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. त्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे अजून जमा झाले नाही. यासाठी शेतकरी अजुन प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार येत्या 31 मे रोजी पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. याबाबत घोषणा केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केली आहे.

 

”पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी किसान सम्मान निधीची घोषणा केली होती.
या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी दिला जातो.
या निधीचा 11 वा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.” असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मध्यप्रदेशमधील एका ऑनलाईन कार्यक्रमात म्हटले आहे.
त्यामुळे प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :- PM Kisan | (PM Kisan Samman Nidhi Yojana 11 installment money date announced farmers modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice | विधवा प्रथा हद्दपार ! हेरवाड गावच्या ऐतिहासिक ठरावाचे शासन निर्णयात रुपांतर

 

Pune Crime | हडपसरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्ड्यावर छापा

 

TTML Share Price | 12 रुपयांवरून वाढून 125 रुपयांच्या पुढे गेला टाटा ग्रुपचा हा शेअर, गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 9.78 लाख रुपये