PM Kisan च्या 10 व्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन दरम्यान तुमच्याकडून चूक तर झाली नाही ना? जाणून घ्या – कशी करू शकता दुरुस्त?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) योजनेच्या 10 व्या हप्त्याची शेतकरी वाट पहात आहेत. डिसेंबरमध्ये हा हप्ता मिळेल अशी आशा आहे. योजनेसाठी रजिस्टेशन करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती.

लाभार्थी पीएम किसानची (PM Kisan) वेबसाइट pmkisan.gov.in किंवा मोबाइल अ‍ॅप PMKISAN GoI च्या माध्यमातून नाव तपासू शकतात.
तसेच किसान हॉटलाइन नंबरवरून संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता. pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx लिंकवर जाऊन लाभार्थी आपल्या डिटेल्स चेक करू शकतात.

लाभार्थी पीएम किसान अंतर्गत मिळणार्‍या पैशांचे स्टेटस आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरद्वारे जाणून घेवू शकतात.

नवीन नोंदणीसाठी आधार कार्ड (Aadhaar Card), पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, कृषीयोग्य जमीनीचे कागदपत्र इत्यादी लागते.
अर्ज करताना काही चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्यासाठी पीएम किसान वेबसाइटवर जा.
तिथे होम पेजवर फामर्स कॉर्नरवर क्लिक करून ‘एडिट आधार डिटेल्स’चा ऑपशन निवडा.

आता आधार नंबर, कॅप्चा कोड भरा आणि तो सबमिट करा. जर तिथे काही गडबड झाली असेल तर ती ऑनलाइन दुरुस्त करा.
जर एखादी माहिती चुकीची असेल तर अकाऊंटंट किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा.
हेल्प डेस्क ऑपशनद्वारे आधार क्रमांक, खाते नंबर आणि मोबाइल नंबर देऊन चूक दुरुस्त करू शकता.

 

Web Title: PM Kisan | pm kisan samman nidhi yojana know how to fix mistakes in application for 10th installment of this scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai News | नारायण राणे, कृपाशंकर सिंह, विजयकुमार गावित, पाचपुतेंच्या चौकशीचं काय झालं? NCP कार्यकर्त्यांचा सवाल

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित प्रस्तावांचा गृहमंत्री यांनी घेतला आढावा

Money Laundering Case | ईडीच्या चौकशीला अनिल देशमुखांची गैरहजेरी, शोधासाठी तपास यंत्रणा झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’