PM Kisan | अडकू शकतात 10 व्या हप्त्याचे 4000 रुपये ! जर झाली असेल ‘ही’ चूक, ‘या’ पध्दतीनं सुधारा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kisan | पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत मोदी सरकार (Modi Government) शेतकर्‍यांना आर्थिक मदत करते. केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी या योजनेचा 10वा हप्ता (PM Kisan Samman Nidhi 10th Installment) जारी करणार आहे. अशावेळी, जर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर याचे स्टेटस आतापासून चेक करण्यास सुरूवात करा, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार (PM Kisan) नाही.

 

लवकरच येईल 10वा हप्ता

 

केंद्र सरकार शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम चार महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपयांच्या हप्त्यात पाठवली जाते. आतापर्यंत 9 हप्ते शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले आहेत आणि आता 10 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे. यासाठी तुम्ही स्टेटसमध्ये आपले नाव तपासू शकता.

 

असे चेक करा यादीत नाव

 

 • सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
 • होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
 • Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
 • नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
 • यानंतर Get Report वर क्लिक करा.
 • नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

चुकांमध्ये अशी करा सुधारणा

 

जर तुमच्या खात्यात 9 वा हप्ता आलेला नाही तर तुमच्या कागदपत्रात काही त्रूटी असू शकतात. अनेकदा लोक आपला आधार नंबर, बँक खाते नंबर भरताना चूक करतात, ज्यामुळे त्यांचा हप्ता अडकतो. जर तुम्ही सुद्धा अशी चूक केली असेल तर घरबसल्या सुधारणा करू शकता. (PM Kisan)

 

 • चूक सुधारण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
 • आता फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन Edit Aadhaar Details ऑपशनवर क्लिक करा.
 • येथे आधार नंबर टाकून कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा.
 • जर येथे एखादी चूक दिसत असेल तर ती ऑनलाइन दुरूस्त करू शकता.
 • आणखी काही चूक असेल तर लेखपाल आणि कृषि विभाग कार्यालयात जा.
 • Helpdesk ऑपशनद्वारे आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबर टाकल्यानंतर ज्या चूका असतील त्या सुधारू शकता.
 • आधार नंबरमध्ये सुधारणांमध्ये, स्पेलिंगची चूक दुरूस्त करू शकता. (PM Kisan)

 

Web Title : PM Kisan | pm kisan samman nidhi yojana update 10th istallment will come in your account check your name in list here marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sania Mirza | सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांग्लादेश दौ-याहून रवाना

Urfi Javed | उर्फी जावेदच्या फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा; तिनं ट्यूब टॉपमध्ये दिली बोल्ड पोज..!

Dnyandev Wankhede | मलिकांच्या नव्या ट्विटनंतर, ज्ञानदेव वानखेडेंनी ‘हे’ फोटो शेअर करुन केले स्पष्टीकरण; म्हणाले…