PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा ‘ही’ कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | पीएम किसान सम्मान निधी योजनेत (PM Kisan Samman Nidhi) मोठे बदल झाले आहेत. या योजनेत होणारा घोटाळा रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता शेतकरी योजनेत (PM KISAN Installment) रजिस्ट्रेशनसाठी रेशन कार्ड अनिवार्य केले आहे. म्हणजे रेशन कार्डशिवाय योजनेचा पुढील हप्ता येणार नाही.

 

रजिस्ट्रेशनमध्ये होणार नाही गडबड

 

रजिस्ट्रेशन दरम्यान आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्र या कागदपत्रांची केवळ सॉफ्टकॉपी (PDF) बनवून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. हार्डकॉपी जमा करणे अनिवार्य नाही.

 

रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे

 

1. बँक अकाउंट नंबर 2. बँक अकाउंट आधारसोबत लिंक असावे. 3. आधार कार्ड 4. pmkisan.gov.in वर कागदपत्र अपलोड करा. 5. आधार लिंकिंगसाठी Farmer Corner पर्यायावर जा आणि Edit Aadhaar Detail च्या ऑपशनवर क्लिक करा.

 

शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4 हजार रुपये

 

PM Kisan या योजनेंतर्गत ज्या शेतकर्‍यांच्या खात्यात 9 वा हप्ता आलेला नाही, त्यांना आता पुढील हप्त्यासोबत मागील रक्कम सुद्धा मिळेल. म्हणजे 4000 रुपये मिळतील. परंतु 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केलेले पाहिजे.

 

शेतकर्‍यांना 10व्या हप्त्याची प्रतीक्षा

 

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकर्‍यांना 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात या योजनेचे 9 हप्ते आले आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे (प्रभाग क्रमांक 9) गावातील नागरिकांना सरंजाम वितरण

Pune Crime | १९ वर्षीय तरूण सहकार्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकरण ! यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Jalna Bank Robbery | पुण्यानंतर जालन्यात भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, रोकड आणि सोनं लंपास