PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला ‘त्या’ सर्व शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, असे चेक करा स्टेटस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्त्याचे पैसे येणार आहेत. जर योजनेंतर्गत (PM Kisan) रजिस्टर शेतकरी दहाव्या हप्त्याची (10th installment) वाट पहात असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये त्यांच्या खात्यात येतील.

 

मोदी सरकारने (Modi Government) मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला पंतप्रधान शेतकरी सम्मान निधी योजनेंतर्गत पैसे ट्रान्सफर केले होते. आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत.

 

या शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

 

ज्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचा (PM Kisan) लाभ मिळालेला नाही त्या लोकांच्या खात्यात दोन हत्प्याचे पैसे एकाच वेळी म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्याच शेतकर्‍यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल.

 

तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही चेक करा

 

जर तुम्ही PM Kisan योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.

 

लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव

 

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा.

6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

अशाप्रकारे चेक करा हप्त्याचे स्टेटस

 

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल.

 

Web Title : PM Kisan | pm kisan will credited 10th installment 4000 rupees check status details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

JanDhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर ‘या’ पध्दतीनं तपासा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

Jica Project PMC | डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ‘जायका’ नदी सुधार प्रकल्पाला मान्यता ! पहिल्या आठवड्यात निविदा मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविणार

Anti Corruption Bureau Thane | 10 लाखाची लाच मागणारे दोन पोलीस उपनिरीक्षक (PSI) अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ