PM KISAN चा 10 वा हप्ता ! 11 कोटी शेतकर्यांना 1.8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर, पहा लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM KISAN | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी PM-किसान योजनेंतर्गत 10.09 कोटी शेतकर्यांना आर्थिक सहाय्य म्हणून 20,946 कोटी रुपयांचा 10 वा हप्ता जारी केला. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, शेतीमध्ये नवनवीन शोध वाढवण्याची आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. (PM KISAN)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi yojana) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो, जो प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देय आहे. पीएम-किसान योजनेची घोषणा फेब्रुवारी 2019 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. पहिला हप्ता डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या कालावधीसाठी देण्यात आला होता.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कार्यक्रमात ही रक्कम लाभार्थ्यांना देताना पंतप्रधान म्हणाले की, ही योजना शेतर्यांसाठी मोठा आधार आहे आणि केंद्राने सर्व हप्ते वेळेवर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले आहेत.
ते म्हणाले की, भारत असा पराक्रम करू शकेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
आजचे ट्रान्सफर केलेले पैसे धरले तर पीएम-किसान अंतर्गत 1.8 लाख कोटींहून अधिक रुपये थेट शेतकर्यांच्या खात्यात हस्तांतरित केले गेले आहेत.
ते म्हणाले, या योजनेमुळे शेतकर्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे आणि खते खरेदी करण्यात मदत होत आहे.
यादीत नाव असे तपासा :
PM KISAN चा 10 वा हप्ता मिळाला किंवा नाही? हे लाभार्थ्यांची यादी तपासल्यावर समजू शकते.
यासाठी पीएम किसान (pmkisan.gov.in) या वेबसाइटला भेट द्या.
पुढे होम पेजवर, ‘फॉर्मर्स कॉर्नर सेक्शन‘ मध्ये ‘लाभार्थी स्टेटस‘ चा पर्याय मिळेल, तिथे क्लिक केल्यानंतर, यादी पाहून स्टेटस तपासू शकता.
यादीत शेतकर्याचे नाव आणि त्याच्या खात्यावर पाठवलेल्या रकमेचा तपशील असतो.
Web Title :- PM KISAN | pm kisans 10th installment see whether your name in the list of beneficiaries or not as more than 1 8 lakh crore rupees transferred to 11 crore farmers
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update