PM Kisan samman nidhi । मोदी सरकारची भेट ! शेतकऱ्यांना 4 हजार रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan samman nidhi) ही मोदी सरकारची (Modi government) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यानुसार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan samman nidhi) योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 हजार रुपये 3 हप्त्यांत पाठवले जातात. याप्रमाणे 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. ज्या शेतकऱ्यांकडे (Farmers) कमीत कमी 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे त्यांना हे पैसे पाठवले जातात. PM Kisan samman nidhi । pm kisan scheme pm modi gives 4000 rupees in pm kisan scheme know about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

तर, या योजनेचा (PM Kisan samman nidhi) लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला नोंदणी करणं गरजेचं असतं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातात. आतापर्यंत सरकारकडून शेतकऱ्यांना आठ हप्ते पाठवण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत एकूण 9.5 कोटी शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. दम्यान, दरम्यान अजूनही काही शेतकरी पात्र तर आहेत मात्र त्यांनी अजून देखील नोंदणी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत डबल संधी सरकारकडून मिळणार आहे. 30 जूनपर्यंत नोंदणी (Registration) केल्यास शेतकऱ्याच्या खात्यात 2 हप्ते म्हणजेच 4000 रुपये येऊ शकतात.

अशा शेतकऱ्यांनी (Farmers) 30 जूनपूर्वी नोंदणी केल्यास त्यांना जुलैमध्ये आठवा हप्ता 2 हजार रुपये पाठवला जाणार आहे. आता नोंदणी करणाऱ्याचा हा पहिला तर सरकारकडून पाठवण्यात येणारा हा आठवा हप्ता असणार आहे. तर नववा हप्ता ऑगस्टमध्ये पाठवला जाईल. आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांनाच नोंदणी (Registration) केल्यानंतर अशाप्रकारे डबल फायदा होईल. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan samman nidhi) देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.

अशी करा नोंदणी –

-> pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

> त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा.

> याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका.

> कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा,

> त्यानंतरच प्रक्रिया पुढे जाईल.

> तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील विचारला जाईल. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

Web Title :- PM Kisan samman nidhi । pm kisan scheme pm modi gives 4000 rupees in pm kisan scheme know about it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’