PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi government) शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतुने पीएम किसान सन्मान निधीची (PM Kisan Sanman Nidhi) सुरुवात केली आहे. सरकारची ही एक अशी योजना आहे, ज्यामध्ये शेतकर्‍यांच्या खात्यात थेट पैसे (Money) पाठवले जातात. pm kisan samman nidhi a great chance to get rs 4000 if you register before june 30 know about it

 Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पीएम किसान सन्मान योजनेत अजूनही अनेक शेतकर्‍यांनी रजिस्ट्रेशन (Registration) केलेले नाही. त्यांच्यासाठी खुप चांगली संधी आहे. ते एकाचवेळी या योजनेंतर्गत 4,000 रुपये मिळवू शकतात.

पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणार्‍या शेतकर्‍यांनी जर 30 जूनच्या अगोदर रजिस्ट्रेशन केले तर त्यांना एकाचवेळी 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळतील. शेतकर्‍यांच्या खात्यात जुलै महिन्याचे 2,000 रुपये येतील. रजिस्ट्रेशन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी हा पहिला हप्ता असेल, तर सरकारकडून हा आठवा हप्ता असेल.

नववा हप्ता ऑगस्टमध्ये जारी केला जाईल. अशावेळी 30 जूनच्या अगोदर रजिस्ट्रेशन करणार्‍या शेतकर्‍यांना पहिला हप्ता जुलैमध्ये आणि दुसरा हप्ता ऑगस्टमध्ये मिळेल एकुण 4,000 रुपये मिळतील.

जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन
सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.
यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.
नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल.
त्यावर क्लिक करा. यानंतर नवीन पेज ओपन होईल.
ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.
नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

Web Titel :- pm kisan samman nidhi a great chance to get rs 4000 if you register before june 30 know about it

 Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते