PM-Kisan स्कीम : 20 दिवसात 30 लाख शेतकर्यांच्या बँक खात्यात पोहचले 2000-2000 रुपये
नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी स्कीम अंतर्गत मागील 20 दिवसात आणखी 30 लाख शेतकर्यांच्या बँक अकाऊंटमध्ये 2000-2000 रुपये पाठवले गेले. यासोबतच या महिन्यात 8 कोटी 81 लाख लाभार्थी झाले आहेत. जर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे आलेले नसतील तर तुमचा रेकॉर्ड चेक करा. कारण यावर्षी नोव्हेंबरपर्यंत आणखी सुमारे पावणे दोन कोटी शेतकर्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून पैसे येण्याची शक्यता कमी संपलेली नाही.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने 30 सप्टेंबरपर्यंत या स्कीम अंतर्गत देशातील सुमारे 10 कोटी 50 लाख शेतकर्यांचे रजिस्टेशन केले होते. हे ते शेतकरी आहेत, ज्यांची कागदपत्र योग्य आहेत. जास्तीत जास्त शेतकर्यांना हा लाभ मिळावा अशी सरकारची इच्छा आहे. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे टार्गेट ठेवले आहे.
स्वामीनाथन फाऊंडेशनने पीएम किसान स्कीम अंतर्गत देण्यात येणारी रक्कम 6000 रूपयांवरून वाढवून 15,000 रुपये वार्षिक करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय किसान महासंघाचे संस्थापक सदस्य विनोद आनंद आणि किसान शक्ती संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह यांनी ती वाढवून 24 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे.
कोण घेऊ शकतात लाभ, आणि कोण नाही
– असे शेतकरी जे भूतकाळात किंवा सध्या संविधानिक पदावर आहेत, माजी अथवा सध्याचे मंत्री, मेयर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभा खासदार शेतकरी असले तरी या योजनेच्या बाहेर समजले जातील.
– केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी आणि 10 हजारपेक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी.
– नोकरदार, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट.
– मागच्या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी.
– केंद्र आणि राज्य सरकारचे मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/समूह डी कर्मचारी यांना लाभ मिळेल.
दुरूस्त करा आपला रेकॉर्ड
* पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
* आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.
* जर तुम्ही या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि लाभार्थींच्या यादीत नाव तपासायचे असेल तर तुम्हाला सरकारने ही सुविधा ऑनलाईन दिली आहे. पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी या वेबसाईटवर तपासू शकता.
कसे चेक कराल रेकॉर्ड
येथे ‘लाभार्थी यादी’ च्या लिंकवर क्लि करा. यानंतर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गावाचा तपशील नोंदवा. एवढे भरल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पहा.
या हेल्पलाईनवर मिळेल मदत
अर्ज केल्यानंतर सुद्धा पैसे न मिळाल्यास आपले लेखपाल, जिला कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्याकडे काम झाले नाही तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी हेल्पलाइन (155261 किंवा 1800115526 टोल फ्री) वर संपर्क करा. तेथूनही प्रतिसाद न मिळाल्यास मंत्रालयाच्या दुसर्या नंबरवर ( 011-24300606, 011-23381092) वर संपर्क करा.