PM Kisan Scheme : ‘या’ लोकांच्या अकाऊंटमध्ये येणार नाही पीएम किसानचा पुढील हप्ता, यादीमध्ये ‘या’ पध्दतीनं तपासा तुमचं नाव

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकार लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात टाकणार आहे. परंतु अनेक कागदपत्रामध्ये आणि नावात एखादी छोटी-मोठी चूक असल्याच्या कारणाने सुद्धा तुमचे पैसे रखडू शकतात. यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही हप्ता येण्यापूर्वीच अशाप्रकारची कोणतीही चूक असेल तर स्वत: ती दुरूस्त करा किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) वर सुद्धा जाऊन सुधारणा करू शकता.

तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले स्टेट्स चेक करू शकता. येथे तुम्ही पाहू शकता की, अजूनपर्यंत किती हप्ते दिले गेले आहेत, पुढील हप्त्याची काय स्थिती आहे. जर एखादा हप्ता रोखला गेला आहे, तर त्याचे कारण काय आहे, जर तुम्हाला वाटत असेल की माहितीमध्ये काही गडबड आहे तर तुम्ही ती सुधारू शकता.

या लोकांच्या खात्यात येणार नाहीत पैसे
* अप्लाय करताना आपला आधार नंबर दिला नसेल किंवा त्यामध्ये चूक झाली असेल तर पैसे येणार नाहीत.
* शेतकर्‍यांना आता आपल्या अर्जात जमीनाचा प्लॉटनंबर सुद्धा सांगावा लागेल. मात्र हा नियम जुन्या लाभार्थ्यांना नाही.
* जर योग्य आणि प्रमाणित डेटा राज्य सरकारने केंद्राला पाठवला नसेल.
* या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याच्या नावावर जमीन असावी.
* जर कुणी शेतकरी शेती करत असेल परंतु शेती त्याच्या नावावर नसून वडील किंवा आजोबांच्या नावावर आहे, तर तो व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
* दहा हजारपेक्षा जास्त पेन्शन घेणार्‍या पेन्शनर्सला लाभ मिळणार नाही.

स्वत: करा चुक दुरूस्त
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्ही https://www.pmkisan.gov.in/updateaadharnobyfarmer.aspx येथे क्लिक करा. याशिवाय जर तुमच्या नावात चूक असेल किंवा अकाऊंट नंबर दुरूस्त करायचा असेल तर वेबसाइटच्या होम पेजवर तुम्ही Benificary status वर क्लिक करून ते दुरूस्त करू शकता.

लिस्टमध्ये असे चेक करा अपले नाव
1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

असे समजू शकते हप्त्याचे स्टेटस
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.