PM-Kisan च्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर ! 12 लाख शेतकर्‍यांना मिळणार ‘किसान क्रेडिट कार्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि उत्तर प्रदेशमध्ये राहणारे आहात तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. योगी सरकार आता अशा 12 लाख लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) जारी करणार आहे. अशावेळी जर आपण सुद्धा यासाठी पात्र असाल तर सहज अर्ज करू शकता.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड एक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहे, ज्याद्वारे शेतकर्‍यांना शेतीसाठी खत, बियाणे, किटकनाशक इत्यादी खरेदी करण्यासाठी सहज कर्ज मिळते. यावर 2 ते 4 टक्के व्याज द्यावे लागते. केवळ वेळेत याची परतफेड करायची असते.

असे बनवा किसान क्रेडिट कार्ड

* पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल साइट (pmkisan.gov.in) वर जा. येथे किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म डाऊनलोड करा.

* फॉर्म कृषीयोग्य जमीनीचे कागदपत्र, पिकाच्या डिटेल्ससह भरावा लागेल.

* आपण कोणत्याही अन्य बँकेतून कोणतेही आणखी किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही याची माहिती द्यावी लागेल.

कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता

* आयडी प्रूफ म्हणून -वोटर कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक.

* केसीसी कोणत्याही को-ऑपरेटिव्ह बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकमधून घेता येईल.

* एसबीआय, बीओआय आणि आयडीबीआय बँकेतून सुद्धा हे कार्ड घेता येते.

* नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय) रुपे केसीसी जारी करते.

कोण घेऊ शकते केसीसी

आता केसीसी केवळ शेती-शेतकर्‍यापर्यंत मर्यादित नाही. पशुपालन आणि मत्स्यपालनास सुद्धा या अतंर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. दुसर्‍याच्या जमीनीत शेती करणार्‍यास सुद्धा याचा लाभ मिळतो. यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 75 वर्ष असावे. शेतकर्‍याचे वय 60 पेक्षा जास्त आहे तर एक को-अ‍ॅप्लीकंट सुद्धा लागेल. ज्याचे वय 60 पेक्षा कमी असावे. शेतकर्‍याने फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी पाहिल की, आपण कशासाठी योग्य आहात.

केसीसीसाठी अशी होईल पडताळणी

अर्जदार शेतकरी आहे किंवा नाही हे महसूल विभागाच्या रेकॉर्डवरून पाहिले जाईल. ओळखीसाठी आधार, पॅन, फोटो घेतला जाईल आणि अ‍ॅफीडेव्हिट घेतले जाईल की, कोणत्याही बँकेत कर्ज थकबाकी नाही. सरकारच्या निर्देशानंतर यासाठीची प्रोसेसिंग फी बँकांनी बंद केली आहे.