PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेसाठी E-KYC केली नसेल तर लाभ घेता येणार नाही; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi Yojana | भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान आणि आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू करण्यात आली. याचा लाभ देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चौथ्या महिन्यात प्रत्येकी 2000 रुपयाप्रमाणे 3 हप्त्यांत 6000 रुपये दिले जातेय. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते दिले गेले आहेत. विशेष म्हणजे पीएम किसान योजना ऑनलाइन चालवली असल्याने यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 11 हप्ता एप्रिल महिन्यात कोणत्याही तारखेला संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात (Bank Account) जमा होऊ शकतो. पण, ज्या शेतकऱ्यांनी अजुन ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पुर्ण करणे आवश्यक आहे.
खरंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आता शेतकऱ्याला 22 मे 2022 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच या योजनेसाठी रेशन कार्ड (Ration Card) क्रमांक देणंही अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीकडून प्रसिद्ध झालं आहे.
असं करा ‘ई-केवायसी’ प्रक्रिया –
– प्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं.
– त्यानंतर ‘किसान कॉर्नर’ या ऑप्शनमध्ये ई-केवायसी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करावं.
– आपला आधार कार्ड क्रमांक टाकून ‘सर्च’ बटणावर क्लिक करावं अन् माहिती भरावी.
– त्यानंतर ‘Submit’ या ऑप्शनवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी.
– शेतकऱ्यांनी या योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं.
– त्यानंतर ‘Farmers Corner’ या ऑप्शनवर क्लिक करावं.
– ‘लाभार्थी यादी’ या ऑप्शनवर क्लिक करावं. आता आपलं राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका आणि गावाचं नाव भरावं.
– ‘Get Report’ या ऑप्शनवर क्लिक केल्यास संपूर्ण यादी दिसेल.
– या यादीत शेतकरी आपल्याला मिळालेल्या हप्त्यांचा तपशील पाहू शकता.
Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | 11th installment date soon to get rupees 2000 complete your e kyc process gh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली