मोदी सरकार तब्बल 11 कोटी 74 लाख लोकांना देणार गिफ्ट, अकाऊंटवर जमा होणार पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात केंद्र सरकार होळीच्या सणानंतर शेतकऱ्यांसाठी एक खास भेट देणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमध्ये (Prime Minister’s Farmers Honors Fund) नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहे. जवजवळ ११ कोटी ७४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर शेतकऱ्यांना ८ वा हप्ता देणार आहे. हे पैसे एप्रिलमध्ये कोणत्याही तारखेला थेट खात्यावर जमा होणार आहे. येत्या काही दिवसांत जर लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये Rft Signed by State असा मेसेज मिळाल्यावर एप्रिलमध्ये या योजनेचा हप्ता मिळणार आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या संकेतस्थळावर अनेक माहिती उपलब्ध केली आहे. या योजनेतील पुढचा हप्ता मिळणार की नाही हे तपासण्यासाठी काही सोप्या पायर्‍या आहेत. https://pmkisan.gov.in/ यावर तुम्ही Farmers Corner पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Beneficiary Status पर्याय निवडल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर आधार नंबर, बँक खात्याचा क्रमांक आणि मोबाइल नंबर यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. तुम्ही जो पर्याय निवडलात त्याची माहिती समाविष्ट केल्यानंतर Get Data वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवहाराची पूर्ण माहिती मिळेल. यामध्ये ८ व्या हप्त्यासंदर्भात माहिती देण्यात आली असणार आहे. तसेच ज्यावेळी खातेदार पेमेंट स्टेटस तपासतो तेव्हा अनेकदा Rft Signed by State for 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th किंवा 7th instalment असं दिसून येतं. याचाच अर्थ राज्य शासनाकडून तुमच्या डेटा चेक केला जातोय. आणि data पूर्णपणे ठीक आहे याची खात्री झाल्यानंतरच राज्य शासन लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करते.

नोंदणी कसं करायचं?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर नवीन नोंदणी (New registration) पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या नव्या पेजवर Adhar number टाकणे. तिथं एक नोंदणी पेज ओपन होऊन त्यावर असलेल्या नोंदणी अर्जामध्ये सर्व प्रकारची माहिती समाविष्ट करावी लागेल. तर कोणत्या राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात राहता याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. याशिवाय Bank account ची आणि Adhar card ची माहितीसुद्धा द्यावी लागेल. ही सर्व माहिती झाल्यानंतर तपशील सेव्ह करा. अर्ज सबमिट झाला की नाही. प्रोसेस सुरु झाली असेल किंवा नसेल तर त्याची माहिती 011-24300606 यावर कॉल करून घेऊ शकतात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. कारण या शेतकऱ्यांची कागदपत्रं केंद्र सरकारकडे आहेत. यासाठी शेतकऱ्यांना सामान्य सेवा केंद्र (Common Service Center) वर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जावं लागेल. नोंदणीसाठी २ फोटो आणि बँक पासबूक आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. तसेच नोंदणीवेळी शेतकऱ्यांचा किसान पेन्शन युनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान, ही योजना २०१९ रोजी सुरु कऱण्यात आलेल्या काहीवेळा गोंधळही झाला आहे. योजनेतील त्रुटी दुरुस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने अनेक ठोस पावले उचलली. शेतकरी सन्मान निधी योजनेत (Farmers Honor Fund Scheme) नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अर्ज भरण्यासाठी जमीनीचा प्लॉट नंबरसुद्दा सांगावा लागणार आहे. नव्या नियमांमुळे जुन्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभावर परिणाम होणार नाही. तसेच पीएम Kisan Mandhan Yojana अंतर्गत १८ ते ४० वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो. त्याला ६० वर्षांपर्यंत अंशत: योगदान द्यावं लागतं. हे योगदान ५५ ते २०० रुपये प्रतिमहिना इतकं असतं. या योगदानानंतर ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना योजनेंतर्गत तीन हजार रुपये महिन्याला किंवा ३६ हजार रुपये वर्षाला पेन्शन मिळेल. ज्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.