PM Kisan च्या 8 व्या हप्त्याची प्रतिक्षा संपली, PM मोदी 14 मे रोजी देणार ‘या’ शेतकर्‍यांना भेट; ‘या’ पध्दतीनं तपासा तुमचं यादीतील नाव

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबरी आहे. पीएम नरेंदी मोदी यावेळी सुद्धा पीएम किसान योजनेचा 8 वा हप्ता जारी करू शकतात. 14 मेरोजी ते पुन्हा शेतकर्‍यांशी संवाद साधून घोषणा करू शकतात. त्यांचा कार्यक्रम pmindiawebcast.nic.in वर पाहता येईल. अ‍ॅग्रीकल्चर मिनिस्ट्रीनुसार, पीएम किसानच्या 8 व्या हप्त्याची तारीख ठरली आहे. पीएम मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकर्‍यांशी चर्चा करतील. यानंतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जारी केला जाईल.

यापूर्वी वृत्त होते की, राज्य सरकारांनी आरएफटी हस्ताक्षर केले आहे आणि केंद्र सरकारने एफटीओ जनरेट केली आहे. शेतकर्‍यांच्या खात्यात आरएफटी साईन बाय स्टेट फॉर एटीन्थ इन्स्टॉलमेंट स्टेटस लिहिले आहे.

असे चेक करा नाव
लिस्टमध्ये असे चेक करा अपले नाव
1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.