खुशखबर ! ‘या’ स्कीमद्वारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मोदी सरकार जमा करणार 53000 कोटी रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 53 हजार कोटींची मदत मिळणार आहे. फेब्रवारी 2020 पूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्क टाकण्याची तयारी करीत आहे. 24 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या तारखेआधी सरकार ही रक्कम शेतकऱ्यांना ट्रान्सफर करू इच्छित आहे. कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “अद्याप या योजनेअंतर्गत 34000 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत 7 कोटी 87 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

6000 रुपये मिळवण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत हे काम करणं गरजेचं- पीएम-किसान सम्मान निधि स्कीमचा हप्ता मिळवण्यासाठी आधार नंबर लिंक करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे.

– जर 30 नोव्हेंबर पर्यंत आधार नंबर लिंक केला नाही तर खात्यात 6000 रुपये येणार नाही.

– जम्मू काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालय मधील शेतकऱ्यांना ही संधी 31 मार्च 2020 पर्यंत आहे.

– पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि कॅबिनेटची पहिली जी बैठक झाली त्यात सर्व 14 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना सम्मान निधीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला.

– नंतर या स्किमचं बजेट वाढवून 87 हाजर कोटी करण्यात आलं. यात अद्याप 34000 कोटी खर्च करण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com