PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेचे पैसे ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) देशातील अनेक पात्र शेतक-यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळतो आहे. मात्र, पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अपात्र आणि बनावट लाभार्थ्यांबाबत केंद्र सरकार आता कठोर कारवाई करीत असल्याचं समोर आलं आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत समजा एखाद्या लाभार्थी शेतक-याने अवैधरित्या या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला हप्त्याचे पैसे परत (Return) करावे लागणार आहेत.

 

मीडियाच्या वृत्तानुसार, पीएम किसान योजनेअंतर्गत बनावट शेतकऱ्यांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर, सुमारे सात लाख बनावट शेतकऱ्यांनी 10 व्या हप्त्याचा लाभ घेतला आहे.
त्यात पती पत्नी, मृत शेतकरी इत्यादींच्या नावे फसवणूक करून योजनेचा लाभ घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत ज्या अपात्र आणि बनावट शेतकऱ्यांनी हफ्त्यांचा लाभ घेतला आहे.
त्यांची ओळख पटवून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
त्यांची ओळख पटवून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

 

Web Title :-  PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan latest news fake farmers will have to return pm kisan yojana money

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा