PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार; ‘हे’ शेतकरी ठरतील अपात्र

पोलीसनामा ऑनलाइन – PM Kisan Samman Nidhi Yojana | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) जवळपास साडेबारा कोटी लाभार्थी शेतक-याला लाभ होतो आहे. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतक-यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजना सुरू केली. दरम्यान या योजने अंतर्गत येणा-या अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून एप्रिल ते जुलै दरम्यान 11 वा हप्ता खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.

 

पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित नवीन माहिती समोर येत आहे. अनेक अपात्र लोक देखील पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांची पडताळणी केली जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 

कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी (Dr. Devesh Chaturvedi) यांच्या निर्देशानुसार,
यासाठी 1 मे ते 30 जून दरम्यान सोशल ऑडिट (Social Audit) करण्यात येत आहे.
या ऑडिटमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र लोकांची माहिती संकलित केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, अपात्रांची नावे यादीमधून काढून टाकली जातील आणि पात्र लोकांची नावे जोडली जातील.
मृत व्यक्ती, एकाच कुटुंबातून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची नावे देखील लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
त्याचबरोबर सोशल ऑडिट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan samman nidhi social audit to start from may pm kisan nidhi 11th instalment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा