PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM किसानचा 11 वा हप्ता आज जमा होणार; कसं तपासाला तुमचं नाव? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) पात्र शेतकरी (Farmers) कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. शेतकरी या योजनेच्या 11 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते. आज ती प्रतीक्षा संपली आहे. या योजनेचा 11 वा हफ्ता आज म्हणजेच 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज शिमल्यात आहेत. इथल्या एका कार्यमक्रमादरम्यान याबाबत ते घोषणा करण्याची शक्यता आहे

 

दरम्यान जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा केवायसी (eKYC) अपडेट असणं अनिवार्य आहे. केवायसी अपडेट करण्याची तारीखही 31 मे आहे. जर या तारखेपर्यंत तुमचा केवायसी अपडेट नसेल तर तुम्हाला या योजनेला लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे हे काम पहिल्यांदा पूर्ण आवश्यक असणार आहे.

 

eKYC ऑनलाईन अपडेट कसे कराल?

pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा

उजव्या बाजूला असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा

आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड अॅड करुन सर्चवर क्लिक करा

आधार कार्डला लिंक्ड असलेला मोबाईल नंबर नोंदवा

आता ‘गेट ओटीपी’वर क्लिक करा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी नोंदवा. यासोबतच तुमचा केवायसी अपडेट होईल.

 

कसं तपासाल तुमचं नाव?

पीएम किसान सम्मान निधिच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा

Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा.

आधार नंबर, बँक खात्याचा क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एकाची निवड करा

Get Data’ वर क्लिक करा. यासोबतच लाभार्थ्यांना आपलं स्टेटस दिसेल.

 

Web Title :- pm kisan samman nidhi yojana pm modi to release 11th installment today how to check your name online

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा