PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची यादी जाहीर; तुमचं नाव आहे का ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी (Farmers) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. दरम्यान, या योजनेचा अकरावा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती आहे. या योजनेअंतर्गत 11 व्या हप्त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर ताबडतोब यादीमध्ये तुमचे नाव तपासा. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

पीएम किसान योजनेचा (PM Kisan) पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो. दुसरीकडे, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान जारी केले जातात. त्याचबरोबर, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवले जातात. याचा अर्थ की या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana)

 

यादीत तुमचे नाव कसे शोधाल ?

पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आता होमपेजवर Farmers Corner निवडा.

Farmers Corner विभागातील Beneficiaries List वर क्लिक करा.

शेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी यादीवर क्लिक करा.

आता ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा.

यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

 

हप्त्याची स्थिती चेक करा –

प्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

आता उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर (Farmers Corner) क्लिक करा.

यानंतर तुम्ही Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या सोबत एक नवीन पेज उघडेल.

येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan yojana update 11th installment date 2022 check pm kisan gov in beneficiary list

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा