पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना : तुम्हाला तिसरा हप्‍ता मिळाला नसेल तर करा ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तिसरा हफ्ता देण्यात आला आहे. या योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे वाटप सुरु झाले असून 12 सप्टेंबर पर्यंत 70 लाख 24 हजार 333 शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपयांचा शेवटचा हफ्ता मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात देखील इतक्याच शेतकऱ्यांना हि मदत मिळाली होती. मात्र जर तुम्हाला या योजनेतील तिसरा हफ्ता मिळाला नाही तर तुम्ही याविषयी कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकता. त्याचबरोबर कृषी मंत्रालयाच्या हेल्पडेस्कवर देखील तक्रार नोंदवू शकता. तसेच 011-23381092 या हेल्पलाइनवर देखील संपर्क साधू शकता.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा झाले आहेत. या योजनेवर केंद्र सरकार 87 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या पैसे वाटपामध्ये गैर भाजप सरकारांमध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. येथील 16,35,059 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याच पद्धतीने गुजरातमध्ये 13,99,099 शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे पैसे मिळाले नाहीत. त्याचबरोबर आसाममध्ये 9,59,747, बिहारमध्ये 4,25,073, हरियाणामध्ये 3,59,810, केरळमध्ये 4,21,955, महाराष्ट्र्रात 5,20,452 आणि उत्तराखंडमध्ये 2,45,203 शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा झाली आहे.

योजनेचा झाला विस्तार –

लोकसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरु करण्यात आली होती. मात्र त्यावेळी केवळ विशिष्ट शेतऱ्यांचाच या योजनेत समावेश करण्यात आला होता. मात्र निवडणुकीनंतर देशभरातील 14.5 कोटी शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला.

शेतकऱ्यांना अटी लागू –

1) आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना याचा लाभ मिळणार नाही.
2) केंद्र आणि राज्य सरकारमधून 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही.
3) डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आणि नोकरी असणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
4) मागील वर्षी आयकर भरलेल्या लोकांना याचा फायदा मिळणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या