PM Kisan योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळली; तुमचे रेकॉर्ड कसं तपासाल? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Yojana) देशातील शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत ७ हप्त्यांमध्ये १४ हजार रुपये मिळाले आहे. आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी आठव्या हप्त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तर ८ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार प्रमाणे जमा केली जाणार आहे. तर PM किसान योजनाच्या लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आलीय.

किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत ११.६६ कोटी शेतकऱ्यांना १.१५ लाख कोटी रुपये दिले गेले आहेत. तर या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा PM किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला होता. यात ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. तसेच, त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचं काम सुरु आहे. मागील काही दिवसांपासून अपात्र शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये परत घेण्यात आले आहेत. केंद्राच्या कृषी विभागाने अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याबरोबर त्यांची नाव हटवण्यास प्रारंभ केला आहे.

असे तपासा तुमचे रेकॉर्ड –

–  प्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाणे.

–  तिथे तम्हाला PM किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.

–  होमपेजवर किसान कॉर्नवर जाणे.

–  जर व्यक्तीने याआधी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार क्रमांक चुकीचा असल्याची माहिती मिळणार आहे.

–  फार्मर अथवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आलीय.

–  PM किसान पोर्टलवर सरकारने शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. त्यामध्ये अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबर याचा वापर करता येणार आहे.

–  ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन बघू शकणार आहात.

PM शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजे काय?

PM शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ७ व्या हप्त्याची रक्कम २५ डिसेंबर २०२० पासून मिळण्यास प्रारंभ झालं आहे. दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण ३ हप्त्यात ६ हजार रुपये जमा केले जातात. तसेच, आतापर्यंत ९ कोटी ४१ लाख शेतकऱ्यांना ७ वा हप्ता मिळाला आहे. तर या योजनेमध्ये पहिला हप्ता हा १ डिसेंबर ३१ ते मार्च या काळात दिला जातो. आणि दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचा लाभ १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.