PM Kisan Samman Yojana | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना दिवाळीची मोठी भेट ! PM Kisan योजनेची रक्कम दुप्पट होणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऐन सणासुदीत आणि शेतकऱ्यांची स्थिती प्रतिकूल असताना मोदी सरकार (Modi Government) एक दिलासादायक निर्णय घेण्याची तयारी करत आहे. जर हा निर्णय घेतला गेला तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. केंद्र सरकार दिवाळीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Yojana) रक्कमेत दुप्पट वाढ करण्याची शक्यता आहे. जर या प्रस्तावाला सहमती मिळाली तर शेतकऱ्यांना वार्षिक 6 ऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा (PM Kisan Samman Yojana) हप्ता दुप्पट केल्यास 2 हजाराचा नाही तर 4 हजाराचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी दिवाळीपूर्वीच याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

यामुळे चर्चेला उधाण
बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह (Amarendra Pratap Singh) यांनी मध्यंतरी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PMKSN) दुप्पट होणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान किसान योजनेची रक्कम दुप्पट (PM Kisan Samman Yojana) होणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

मोबाईल अ‍ॅप
पंतप्रधान किसान यांच्या ऑनलाइन पोर्टल www.pmkisan.gov.in किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे तपशील तपासू शकता. एनआयसीने आपली व्याप्ती वाढविण्यासाठी एक मोबाईल अ‍ॅप देखील विकसित केले आहे.

अशी करा नोंदणी
आपण जवळच्या पोस्ट ऑफिसच्या सीएससी काउंडरला (Post Office CSC Counter) भेट देऊन नोंदणी करु शकता. यासाठी किसान पीएम योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलला भेट देऊन तुम्ही तुमच्या नावात प्रवेश करु शकता. तसेच पंतप्रधान किसान जीओआय मोबाईल अ‍ॅपद्वारे (GOI Mobile App) ही घेऊ शकता. यासाठी तुम्ही गगुल प्ले स्टोअरमध्ये जाऊन pnkisan डाऊनलोड करावे लागेल.

 

नवी शेतकऱ्यांनी अशी करावी नोंदणी
1. आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड त्यात योग्य प्रकारे समाविष्ट करायचे आहे. मग पुढे चालू बटणावर क्लिक करा.

2. त्यानंतर नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील, आयएफएससी कोड इ. नोंदणी करुन प्रविष्ट करा.

3. नंतर गोवर क्रमांक, खाते क्रमांक इत्यादी जमिनीचा तपशील प्रविष्ट करा आणि सर्व माहिती वाचा

4. आता पुन्हा सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुमची पीएम किसान मोबाईल अ‍ॅपवरील तुमची नोंदणी पूर्ण होईल.

 

Web Title :- PM Kisan Samman Yojana | pm kisan samman yojana to get two instalments farmers hopes raised what will be the decision of the modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंग यांच्यावर निशाणा, म्हणाले -‘आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरु आहे’

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’च्या स्कीममधून देखील जमा करू शकता 1 कोटी रुपये; दरमहा करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या

Atmanirbhar Bharat Abhiyan | देशाच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला मोदी सरकारची मोठी भेट ! 7 मेगा टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेची अधिसूचना जारी