
PM Kisan Scheme | पीएम किसानचा 10 वा हप्ता ! खात्यात रक्कम येताच अशाप्रकारे शेतकर्यांना मिळेल माहिती, जाणून घ्या कुणाला मिळेल हा लाभ
नवी दिल्ली : PM Kisan Scheme | पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकर्यांच्या खात्यात 15 डिसेंबरला येण्याची शक्यता आहे. 12 कोटीपेक्षा जास्त शेतकर्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. मात्र, शेतकर्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी कोणतीही तारीख सरकारकडून सांगण्यात आलेली नाही. (PM Kisan Scheme)
परंतु 10 व्या हप्त्याबाबत अंदाज वर्तवला जात आहे की, 15 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान खात्यात पैसे येऊ शकतात. तुमच्या खात्यात पैसे कधी येतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्टेटस जाणून घेऊ शकता.
ज्या लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये केवळ Rft Signed by State For 10nth Installment दिसत असेल तर तुमच्या खात्याची पडताळणी झाली आहे आणि कागदपत्र योग्य आहेत. म्हणजे आता राज्य सरकार केंद्र सरकारकडे पैसे ट्रान्सफर करण्याची विनंती करेल.
यानंतर तुमच्या स्टेटसमध्ये FTO दिसेल, जे आता लाभार्थ्यांच्या खात्यात दिसत नाही. जर स्टेटसमध्ये FTO is Generated and Payment confirmation is pending दिसत असेल तर तुमच्या खात्यात लवकरच पुढील हप्ता येणार आहे. म्हणजे राज्य सरकारद्वारे कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तुमचा पुढील हप्ता तयार करण्यात आला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल.
असे जाणून घ्या स्टेटस
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा.
येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका.
तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल. (PM Kisan Scheme)
Web Title :- PM Kisan Scheme | 10th installment of pm kisan scheme as soon as amount arrives in the account information to know by farmers status
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Sukanya Samriddhi Yojana (SSY) | नवीन वर्षात तुमच्या कन्येला द्या सुकन्या समृद्धी योजनेची भेट, जाणून घ्या पूर्ण डिटेल
- Sharmila Tagore | करिना कपूरपेक्षाही हॉट होती तिची सासू शर्मिला टैगोर, बिकिनीवरील फोटो पाहून तुम्हालाही…
- 7th pay commission | जुनी पेन्शन योजना देण्यावर विचार करतंय मोदी सरकार, जाणून घ्या कोणत्या कर्मचार्यांना होणार फायदा