PM Kisan Scheme | सरकारने 11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले 1.35 लाख कोटी रुपये, पुढील हप्त्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Scheme) आतापर्यंत 11 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यात 1.35 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली आहे. या प्रमुख कार्यक्रमाचा सर्व पात्र शेतकर्‍यांना लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे असे सरकारने म्हटले आहे. जर तुम्ही सुद्धा PM Kisan Scheme मध्ये अजूनपर्यंत सहभागी झाला नाहीत तर असे करा रजिस्ट्रेशन.

असे करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

पीएम-किसानच्या पोर्टल (pmkisan.gov.in) वर क्लिक करा.

–  याच्या फार्मर कार्नरच्या NEW FARMER REGISTRATION च्या पयार्यावर क्लिक करा.

–  यानंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाका.

–  यानंतर क्लिक हियर टू कंटिन्यूवर क्लिक करा.

–  यामध्ये फॉर्म दिसेल, तो पूर्ण भरा.

–  तो भरून सेव्ह करा. आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

पुढील हप्त्यासाठी द्यावी लागेल ही माहिती

2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत नवीन रजिस्ट्रेशन करणार्‍या शेतकर्‍यांना आता अर्जात आपल्या जमीनचा प्लॉट नंबर सुद्धा सांगावा लागेल. मात्र, नवीन नियमाचा प्रभाव योजनेतील जुन्या लाभार्थ्यांवर पडणार नाही.

Web Title : PM Kisan Scheme | pm kisan registration 11 crore farmers have received 1 35 lakh crore rupees check knowl

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Post Office Schemes | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 बेस्ट सेव्हिंग स्कीम आहेत अतिशय खास; गुंतवणुकीवर मिळेल ‘डबल’ नफा

नटून-थटून ऑनलाइन क्लास घेत होती टीचर, मुलीने सर्वांसमोर केले असे वर्णन; पहा Viral Video

Anil Deshmukh | ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाखाची मालमत्ता जप्त