PM Kisan Scheme | 10 व्या हप्त्याबाबत समोर आली मोठी माहिती, जर तुमचा सुद्धा अडकला असेल जुना हप्ता तर अकाऊंटमध्ये येतील पूर्ण 4000 रुपये; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Scheme | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या (Pm kisan Status) लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा दहाव्या हप्त्याची (Pm Kisan 10th installment) प्रतीक्षा करत असाल तर लवकरच तुमच्या खात्यात 10व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान सरकार शेतकर्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते, परंतु अजूनही शेतकर्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर झालेले नाही. (PM Kisan Scheme)
देशात अजूनही लाखो शेतकर्यांना 9 व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. पीएम किसान पोर्टलवर मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकर्यांनी 9व्या हप्त्यासाठी अर्ज केला असेल त्यांचे पैसे 10व्या हप्त्यासोबत खात्यात येतील.
याचा अर्थ हा आहे की या लोकांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. केंद्र सरकार या लोकांना 9व्या आणि 10व्या हप्त्याचे पैसे एकाचवेळी ट्रान्सफर करेल. तुम्ही पीएम किसान स्कीमच्या (PM Kisan Scheme) वेबसाइटवर आपल्या हप्त्याचे स्टेटस तपासू शकता –
अशाप्रकारे चेक करा हप्त्याचे स्टेटस
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा.
आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला स्टेटस दिसेल.
केंद्र सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे ट्रान्सफर केले होते.
आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्यांच्या खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत.
आतापर्यंत शेतकर्यांच्या खात्यात 9 हप्त्यात पैसे पाठवण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत (PM Kisan Samman Nidhi Yojana)
1 वर्षात 3 आठवड्यात शेतकर्यांना सरकार 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते.
दर 4 महिन्यात शेतकर्यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातात.
Web Title :- PM Kisan Scheme | pm kisan samman nidhi scheme 10th installment update pm kisan nic in 4k rupees
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update