PM Kisan Scheme | खुशखबर ! नवीन वर्षात ‘या’ शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 4000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Scheme | पीएम किसानच्या 10व्या हप्त्याबाबत (10 Installment of PM Kisan) नवीन तारीख समोर आली आहे. काही शेतकर्‍यांना केंद्र सरकारचा मेसेज आला आहे की, 10व्या हप्त्याचे पैसे आता 1 जानेवारीला येतील. जर असे झाले तर पीएम किसान योजनेंतर्गत यावेळी 12 कोटी शेतकर्‍यांना लाभ होईल. मात्र, काही मीडिया रिपोर्टनुसार, शेतकर्‍यांना या दिवसात दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे. या शेतकर्‍यांच्या खात्यात 4000 रुपये येतील. यासाठी कोण पात्र आहेत ते जाणून घेवूयात. (PM Kisan Scheme)

 

शेतकर्‍यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात, जे दर चार महिन्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. ज्याचा उद्देश देशभरातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना मदत करणे आहे.

 

आत्तापर्यंत पीएम योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) शेतकर्‍यांना 9वा हप्ता देण्यात आला असून 10वा हप्ता प्रलंबित आहे. बहुतेक शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात 2000 रुपये मिळतील परंतु काही शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात 4000 रुपये मिळू शकतात.

 

हे शेतकरी 4000 रुपयांसाठी असतील पात्र
पीएम किसान योजनेसाठी दर चार महिन्यांनी 2000 रुपये पाठवले जातात. ज्या शेतकर्‍यांनी नववा हप्ता भरताना नोंदणी केली होती, मात्र त्यांना नववा हप्ता मिळाला नाही. ते 10 व्या हप्त्यासह रु.4000 मिळण्यास पात्र आहेत. अशा स्थितीत या शेतकर्‍यांना 4000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

हे काम करणे बंधनकारक
पीएम किसान वेबसाइटनुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकर्‍यांसाठी EKYC अनिवार्य आहे.
कृपया आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर्स कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा
आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधू शकता.

 

आता नोंदणी केल्यास येऊ शकतो 10 वा हप्ता
तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल, तर ती करावी.
कारण डिसेंबरपूर्वी नोंदणी केल्यास, 10 वा हप्ता तुमच्या खात्यात नवीन वर्षातच येऊ शकेल.
नोंदणी करण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा आणि इतर कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

 

Web Title :- PM Kisan Scheme | pm kisan yojana 4000 rupees can come in the account of these farmers on the new year know who eligible

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MahaTET Exam Scam | TET घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेनंतर ‘या’ आरोपीकडून 24 किलो चांदी 2 किलो सोनं, हिरे जप्त

Maharashtra Lockdown | ‘राज्यात 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागल्यास Lockdown – राजेश टोपे

Omicron Restrictions Pune | पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ! ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध; जाणून घ्या सविस्तर