PM Kisan Yojana Date | ठरलं ! पीएम किसानचे 2 हजार रुपये ‘या’ तारखेला येणार, कृषी मंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana Date | पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana Date) 10 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी (Good News for farmers) चांगली बातमी आहे. 10 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर होण्याची तारीख समोर आली आहे. देशभरातील शेतकर्‍यांना नवीन वर्षानिमित्त मोदी सरकार (Modi Government) भेट देणार आहे. कारण, 1 जानेवारी 2022 ला केंद्र सरकार शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये ट्रान्सफर करणार आहे.

 

केंद्र सरकार दरवर्षी दोन हजार रूपयांच्या तीन हप्त्यात 6 हजार रूपये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर करते. आतापर्यंत अंदाज वर्तवला जात होता की, 10 हप्ता 25 डिसेंबरला पाठवला जाऊ शकतो, कारण गेल्यावर्षी सुद्धा 25 डिसेंबरला हप्ता आला होता. तत्पूर्वी 15 डिसेंबर तारीख समोर आली होती, परंतु आता स्पष्ट झाले आहे की, नवीन वर्षात 1 जानेवारीला पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पाठवले जातील. (PM Kisan Yojana Date)

पीएम किसानच्या दहाव्या हप्त्याबाबत शेतकर्‍यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी (Prime Minister Shri. Narendra Modi) 1 जानेवारी 2022 ला दिवसा 12 वाजता पीएम किसान योजनेचा हप्ता जारी करतील आणि शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदान जारी करतील.

 

या कार्यक्रमात तुम्ही pmindiawebcast.nic.in अथवा दूरदर्शनच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.
कार्यक्रमाचे आपणा सर्वांना आमंत्रण आहे. आपला, नरेंद्र सिंह तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
(Narendra Singh Tomar, Minister of Agriculture and Farmers Welfare).

 

 

Web Title :- pm kisan yojana date confirm 1st january 2022 new year modi government 2000 sms by narendra singh tomar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘राष्ट्रपती राजवट स्विकारुन कारभार केंद्राकडे द्या’ – चंद्रकांत पाटील

BJP MLA Gopichand Padalkar | ‘अजित पवारांना मुख्यमंत्री केले, तर 4 दिवसांत राज्य विकतील’

Pune Crime | पुण्यात मुंढवा पोलिसांकडून गावठी पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना अटक, अग्नीशस्त्रे जप्त

Tiger Shroff | ‘गणपथ’च्या शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत, अभिनेत्याने शेअर केला फोटो

PDCC Election | अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी आ. रमेश थोरात यांची सलग आठव्यांदा संचालक पदी बिनविरोध निवड

Mohammad Huraira | शोएब मलिकच्या सावत्र भावाच्या मुलांनं पाकिस्तान क्रिकेटमध्ये घातली धूमाकूळ, पाहा कोण आहे ‘हा’ खेळाडू?