PM KISAN Yojana चा 8 हफ्ता जारी; शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आठव्या हफ्त्याचे 2,000 रुपये पोहोचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपले बँक खाते तपासणे गरजेचे आहे.

पंतप्रधान मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये ही योजना सुरु केली. या योजनेनुसार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे यावेळी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार 9.5 कोटी लाभार्थ्यांना 19,000 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात 58 हजार कोटी

कोरोना संकटाच्या काळात आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के जास्त गहू खरेदी केला आहे. या गव्हाचे जवळपास 58 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कर्जही मिळू शकते

मोदी सरकार या शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे हे लोन दिले जाते. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते.

असे तपासा खाते…

–  पीएम किसान सम्मान निधी योजना ची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.

–  वेबसाईटच्या उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक करा.

–  Farmers Corner च्या खाली Beneficiary Status चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.

–  नवीन पेज ओपन होईल, त्यावर तुमचा आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर चा पर्याय निवडा.

–  जो पर्याय येईल त्यावर तुमही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. यानंतर ‘Get Data’वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्व हप्त्यांची माहिती मिळेल.