
PM Kisan Yojana | खुशखबर! किसान योजनेचा १५ वा हप्ता ‘या’ दिवशी येणार, दिवाळी होणार गोड
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) १५ व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. हा हप्ता (PM Kisan Yojana) १५ नोव्हेंबर २०२३ रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ८ कोटी शेतकऱ्यांना १५ वा हप्ता दिला जाणार आहे (PM Kisan 15th Installment Date).
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वर्षाला ६,००० रुपये दिले जातात. ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (सरकारी लाभ थेट बँक खात्यात) योजना आहे.
या योजनेत दर चार महिन्यानंतर २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक ६,००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यांमध्ये जमा होतात. पीएम किसानचा १५ वा हप्ता ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
लाभार्थी यादीत नावे असलेल्या शेतकऱ्यांनाच १५ वा हप्ता दिला जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आपले नाव यादीत
तपासून घ्यावे. केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. फॉर्म भरताना सर्व तपशील बरोबर असावेत.
यासाठी अर्जात दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण नाव, वडिलांचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक,
मोबाईल क्रमांक यापैकी एखादा तपशील चुकीचा असल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. (PM Kisan Yojana)
पीएम किसान योजनेच्या अधिक माहितीसाठी [email protected] वर ईमेल आयडी पाठवू शकता.
तसेच हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ किंवा १८००११५५२६ किंवा ०११-२३३८१०९२ या वर संपर्क साधू शकता.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा