PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! KYC बाबत आली मोठी अपडेट, जाणून घ्या आता नवीन डेडलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 11 व्या हप्त्यानंतर आता सरकारने kyc अनिवार्य केले आहे (PM Kisan Yojana). जर तुम्ही आत्तापर्यंत या योजनेंतर्गत केवायसी केले नसेल, तर ते तात्काळ करा. केवायसी केले नाही तर पुढील हप्ता मिळणार नाही. कारण, सरकारने त्याची अंतिम मुदत वाढविण्यावर विचार करण्यास नकार दिला आहे (PM Kisan Latest Update).

 

केंद्र सरकारने केली घोषणा
केंद्र सरकारने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य eKYC ची मुदत वाढवली होती. पीएम किसान पोर्टल (pmkisan.gov.in) वर ही माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान वेबसाइटनुसार, ’सर्व PM KISAN लाभार्थ्यांसाठी eKYC अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 होती. म्हणजेच पुन्हा एकदा त्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. अशावेळी केवायसी केले नसेल तर आजच करून घ्या.

 

e-KYC शिवाय मिळणार नाहीत पैसे
e-KYC शिवाय हप्ता अडकू शकतो. पीएम किसान पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की, आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी शेतकर्‍यांना Kisan Corne मधील e-KYC पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता.

जाणून घ्या प्रक्रिया
1. आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील ’केवायसी’ पर्यायावर क्लिक करा
2. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधा.
3. तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ते घरी बसून प्रक्रिया पूर्ण करू शकता.
4. यासाठी प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
5. उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब आढळतील. सर्वात वर तुम्हाला ई-केवायसी लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.

याशिवाय, तुम्ही तुमच्या हप्त्याचे स्टेटस सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan latest update last date of pm kisan e kyc is 31 august see here process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | TATA Group च्या 3 रुपयांच्या शेअरचा जबरदस्त रिटर्न, एक लाखाचे केले 169 कोटी

 

 Beed Accident | दुर्देवी ! महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 9 वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू

 

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल