PM Kisan Yojana | कोट्यवधी शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 11व्या हप्त्याबाबत ही नवीन माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे, ज्याद्वारे देशातील करोडो शेतकर्‍यांना आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. केंद्र सरकार दर चार महिन्यांच्या अंतराने वर्षातून तीनदा हा हप्ता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवते. (PM Kisan Yojana)

 

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी या योजनेचा 10 वा हप्ता हस्तांतरित केला होता. ताज्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यात 11 वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती, तेव्हापासून दर चौथ्या महिन्याला शेतकर्‍यांना 2 हजार रुपयांची मदत दिली जाते. (PM Kisan Yojana)

 

अर्जाचे स्टेटस असे तपासा

सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा

वेबसाइटच्या उजव्या बाजूला ’फार्मर्स कॉर्नर’ वर क्लिक करा

आता पर्यायातून beneficiary Status वर क्लिक करा

स्टेटस तपासण्यासाठी, काही तपशील जसे की आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाइल नंबर नोंदवावा लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे नाव यादीत आहे की नाही, ही माहिती तुम्हाला मिळू शकते.

या लोकांना मिळत नाही योजनेचा लाभपीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ संस्थागत शेतकर्‍यांना मिळत नाही. घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही. याशिवाय केंद्र सरकारचे माजी किंवा विद्यमान मंत्री, राज्य सरकारचे माजी किंवा विद्यमान मंत्री, लोकसभा किंवा राज्यसभा किंवा राज्य विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य, महापालिका किंवा जिल्हा पंचायतींचे माजी किंवा विद्यमान महापौर यांना योजनेचा लाभ मिळत नाही.

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojana 11th installment date update farmers to get 2000 rupees in month of april

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PVC Aadhaar Card मागवणं झालं एकदम सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं कार्ड; जाणून घ्या

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी उपांत्य फेरीत दाखल

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 70 रुपये गुंतवून मिळवू शकता दीड लाख रुपये, जाणून घ्या