PM Kisan Yojana | केंद्र सरकारने तात्पुरती स्थगित केली ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसे होणार ई-केवायसी (e-KYC)

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांपैकी एक असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. आता योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी (PM Kisan e-KYC) करण्यात काही अडचणी येऊ शकतात. (PM Kisan Yojana)

 

आतापर्यंत तुम्ही घरी बसून ई-केवायसी करू शकत होतात, पण आता ते शक्य होणार नाही. कारण, तुम्ही मोबाईलवर ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी वापरत असलेला OTP तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.

 

केवायसीसाठी जावे लागेल सीएससीमध्ये

ही माहिती पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दाखवली जात आहे. ही प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती नाही. या वेबसाइटनुसार, आता तुम्हाला KYC साठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण द्यावे लागेल. आत्तापर्यंत आधार क्रमांकाचा वापर करून मोबाईल ओटीपीद्वारे ई-केवायसी सुविधा दिली जात होती. (PM Kisan Yojana)

 

वाढवली ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत

पीएम किसान योजनेअंतर्गत आगामी हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, मोदी सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. पोर्टलनुसार, ही प्रक्रिया 31 मे 2022 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. यापूर्वी ही तारीख 31 मार्च 2022 होती, जी नंतर वाढवण्यात आली.

 

नोंदणीकृत शेतकर्‍यांसाठी ई-केवायसी अनिवार्य

पीएम किसान पोर्टलनुसार, देशातील सुमारे 12.53 कोटी शेतकरी या योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभ मिळवणार्‍या शेतकर्‍यांना केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे.

 

लवकरच मिळणार पुढील हप्ता

या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दरमहा 500 रुपये दिले जातात.
यामध्ये 4 महिन्यांचा हप्ता एकाच वेळी दिला जातो.
अशा प्रकारे वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत.
1 जानेवारी 2022 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर 10 वा हप्ता पाठवण्यात आला.
लवकरच शेतकर्‍यांना 11 वा हप्ता दिला जाईल.

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojana aadhaar based ekyc facility
has been temporarily suspended know how ekyc will be done

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा