PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी खुशखबर आहे. सरकारने पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 10 हप्ता जारी करण्याची तारीख जाहिर केली आहे.

 

आजपासून 5 दिवसानंतर म्हणजे 1 जानेवारी 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पीएम किसान योजनेंतर्गत 10वा हप्ता जारी करतील. तर, काही शेतकर्‍यांच्या खात्यात पूर्ण 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील.

 

या शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये
PM Kisan Yojana साठी दर चार महिन्यांनी 2000 रुपये पाठवले जातात. ज्या शेतकर्‍यांनी नववा हप्ता भरताना नोंदणी केली होती, मात्र त्यांना नववा हप्ता मिळाला नाही. ते 10 व्या हप्त्यासह रु.4000 मिळण्यास पात्र आहेत. अशा स्थितीत या शेतकर्‍यांना 4000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

 

e-KYC शिवाय मिळणार नाहीत पैसे
पीएम किसान वेबसाइटनुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकर्‍यांसाठी EKYC अनिवार्य आहे. कृपया आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर्स कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधू शकता.

पैसे मिळतील किंवा नाही तपासा
जर तुम्ही PM Kisan योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.

 

लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा.

6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

हेल्पलाइन नंबरवर करा संपर्क
तुमचे सर्व तपशील बरोबर असतील आणि त्यानंतरही तुमचे नाव यादीत समाविष्ट नसेल, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून तुमचे नाव जोडू शकता. यासाठी 155261 किंवा 011-24300606 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. इथे तुमची समस्या दूर होईल.

 

ऑफिशियल वेबसाइटवर सुद्धा नोंदवा तक्रार
याशिवाय तुमच्या जिल्ह्यातील कार्यालयात जाऊन तेथील अधिकार्‍याशीही संपर्क साधता येईल. येथे तुम्ही तुमची समस्या सांगू शकता आणि सोडवू शकता. याशिवाय तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकता.

 

 

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojana check latest installment date beneficiary status registration latest installment prime minister narendra modi new year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 132 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्याच्या कर्वेनगर परिसरात भरदिवसा 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून; प्रचंड खळबळ